विनातिकीट प्रवास, हाच श्वास!

विनातिकीट प्रवास, हाच श्वास!

लोकल सुरु नसल्यामुळे सर्वसामान्यांचे खूपच हाल होताहेत. त्यामुळे आता प्रवासी ठाकरे सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत.

दोन लसी घेतलेल्यांसाठी लोकलप्रवास मुभा अजूनही देण्यात आलेली नाही. त्यामुळेच आता लोकांनी बंड करायचे ठरवलेले आहे हे स्पष्ट दिसून येते. गेल्या काही दिवसांमध्ये विनातिकीट प्रवास करण्याची संख्या खूपच वाढलेली आहे. त्यामुळेच अनेकांनी ठाकरे सरकारच्या निर्बंधरुपी नियमांना केराची टोपली दाखवत रेल्वे प्रवास करायलाही सुरुवात केली.

मध्य रेल्वेमार्गावर जवळपास जुलै महिन्यात ५४ हजार विनातिकीट प्रवाशांवर कारवाई झालेली आहे. गेल्या चार महिन्यांपेक्षा जुलै महिन्यात सर्वाधिक कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळेच एकट्या जुलै महिन्यात ठाकरे सरकारच्या जाच निर्बंधाला नागरिकांनी केराची टोपली दाखवलेली आहे हे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे गेल्या चार महिन्यात अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांची ४ हजार ९४ बनावट ओळखपत्रेही जप्त केली आहेत. तसेच कारवाईतून एक कोटी ८० लाख रुपयांचा दंड वसूल केला. एप्रिल २०२१ मध्ये २८ हजार ९१० विना तिकीट प्रवाशांवर कारवाई झाली होती. त्यानंतर मे मध्ये हीच संख्या ३२ हजार ९०७ आणि जूनमध्ये ४० हजार ५२५ एवढी झाली.

उपनगरातून मुंबईच्या दिशेने हजारो लाखो लोकांच्या येण्याजाण्यासाठी लोकल हाच सर्वोत्तम पर्याय आहे. सध्या कार्यालयांमध्ये उपस्थिती सुद्धा अनिवार्य झालेली आहे. त्यामुळे रस्तामार्गे कार्यालय गाठणे अतिशय जिकीरीचे झालेले आहे. ठाकरे सरकारने निर्बंध मोडण्यास जनतेस प्रवृत्त केलेले आहे.

हे ही वाचा:

दुर्दैवी!! १६ कोटींचं इंजेक्शन देऊनही ती वाचलीच नाही

…आणि दोघांनीही विभागून घेतले सुवर्णपदक

भारतीय महिला हॉकीपटूंची ऐतिहासिक कामगिरी! उपांत्य फेरीत धडक

आता आर या पार! गोंधळ संपवा, निर्णय घ्या!

आजच्या घडीला बाजारपेठा तसेच इतर अन्य दुकानेही सुरू झालेली आहेत. मग लोकलसेवा बंद का असाच सूर आता सामान्य जनता आळवू लागलेली आहे. आता लवकरात लवकर लोकल सुरू न झाल्यास सामान्यांचा एल्गार पाहायला मिळणार हे आता निश्चित झाले आहे.

Exit mobile version