पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच लक्षद्वीपला जाऊन आले. त्यानंतर लक्षद्वीप आणि मालदीव यावरून नव्या वादाला तोंड फुटलेले असताना भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. बऱ्याचदा कोणतीही मोठी घटना घडल्यानंतर लोक उत्सुकता म्हणून आणि अधिकची माहिती घेण्यासाठी सर्वात पहिल्यांदा गुगलवर जाऊन सर्च करतात. त्यामुळे त्या गोष्टी गुगलवर ट्रेंड होतात. अशातच या नव्या वादामुळे लक्षद्वीप जगभरात इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केले जाणारे ठिकाण ठरले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीपमध्ये आल्यानंतर गेल्या काही दिवसांत लक्षद्वीप गुगलवर एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आले आहे की, गेल्या २० वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. भारतातील बहुतेक लोक मालदीवला भेट देतात, गेल्या वर्षी २.०९ लाख भारतीय पर्यटकांनी मालदीवला भेट दिली. परंतु, आता गुगल सर्चमध्येही लोकांनी मालदीवऐवजी लक्षद्वीप सर्च केल्यानं २० वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक झाला आहे. पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर लक्षद्वीप हे गुगलवर सर्वाधिक सर्च झालेले ट्रेंडिंग डेस्टिनेशन ठरले आहे.
विशेष म्हणजे लक्षद्वीप गेल्या महिन्यात सर्चमध्ये मालदीवपेक्षा बरंच मागे होतं. परंतु, आता लक्षद्वीपने गुगल सर्चमध्ये २० वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. त्यातही नवल म्हणजे मालदीवमध्येही लक्षद्वीप सर्च केलं जातं आहे. त्यामुळेच अनेकांनी मालदीव सोडून आता लक्षद्वीपला तिकीट बुक करणे सुरू केल्याचं चित्रही निर्माण झालं आहे.
हे ही वाचा:
कर्नाटक काँग्रेसने २२ जानेवारीला मंदिरांना विशेष पूजा करण्याची दिली सूचना!
जम्मू काश्मीर बदलतंय, वर्षभरात पर्यटकांची लाट!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळाले अयोध्येचे निमंत्रण…
पोलिसांनी आता दांडा नव्हे तर डेटाच्या आधारे काम करावे
३६ बेटांचा समूह असलेला लक्षद्वीप हा ३२ चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेला आहे. लक्षद्वीप हे भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे, परंतु असे असूनही येथे कमी लोक भेट देतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर लक्षद्वीपमध्ये पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.