कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आल्यावर राज्य सरकारने निर्बंधांवर शिथिलता आणायला सुरुवात केली आहे. निर्बंध शिथिलीकरणानंतर बेस्टमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच रेल्वे प्रवासाला परवानगी असल्यामुळे अजूनही अनेक प्रवाशांसाठी बेस्ट बस हाच पर्याय सध्या उपलब्ध आहे. त्यामुळे बेस्टमधून प्रवास करताना उभ्याने प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे.
जूनमध्ये सरकारी आणि खासगी कार्यालयांतील उपस्थितीत ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली. मात्र प्रवाशांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली नव्हती. बेस्टमधूनही ५० टक्के प्रवासी नेण्याची परवानगी होती. पण वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन बेस्टला पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली. साधारण ७ जूनला १८ लाख १३ हजार प्रवाशांनी बेस्टमधून प्रवास केला होता. बेस्टमधून उभ्याने प्रवास करण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
हे ही वाचा:
‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट हाच एकमेव मार्ग!’
भारतात कोरोना संदर्भात ‘ही’ दिलासादायक बातमी
नारायण राणे यांचं काही चुकलं नाही
ऑगस्टमध्ये निर्बंध आणखी शिथिल करण्यात आले आणि लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच रेल्वे प्रवासाची मुभा दिल्याने अनेक प्रवाशांसमोर अडचणी उभ्या राहिल्या. त्यातही केवळ पासची सक्ती केल्याने कामानिमित्त कमी वेळा घराबाहेर पडणाऱ्यांनी बेस्टचा पर्याय निवडला. लसीकरण कमी होत असल्याने दोन डोस घेतलेल्यांची संख्याही कमीच आहे. त्यामुळे बेस्टमध्ये गर्दीच होत असून लोकांना उभ्याने प्रवास करण्यास भाग पडत आहे. सध्या २४ लाख ७७ हजार प्रवासी बेस्टमधून प्रवास करत असून गेल्या दोन महिन्यांत सहा लाख ६४ हजार प्रवाशांची वाढ झाली आहे.
गर्दीमुळे सुरक्षित अंतर पाळले जात नाही. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी प्रचंड गर्दी होत असताना प्रवाशांना दुसरा पर्याय नसल्यामुळे त्यांना बसमधून उभ्यानेच प्रवास करावा लागतो. बस वाहकाकडून उभ्याने प्रवास करण्यास परवानगी नसल्याच्या नियमाची आठवण करून दिली जाते, पण लोकांना दुसरा मार्ग उपलब्ध नाही. गर्दीच्या वेळी प्रवासी ऐकत नाहीत. अनेकदा वाहक आणि त्यांच्यात वादही होतात. त्यामुळे बसमध्ये गर्दी होते, असे घाटकोपर आगारमधील वाहक अविनाश वाळके यांनी सांगितले.
बेस्टमधून उभ्याने प्रवास करण्यास परवानगी नाही आणि तसे निर्देश दिले आहेत. मात्र वाढलेल्या गर्दीमुळे प्रवाशांना पर्यायही नाही. मात्र प्रवास सुखकर व्हावा आणि गर्दी कमी व्हावी यासाठी बेस्टकडून नियोजन केले हात आहे, असे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.