दिल्लीच्या अलीपूरच्या खामपूर गावातील रहिवासी या भागात सुमारे १२० वर्षे जुन्या असलेल्या ‘पवित्र’ वटवृक्षावर बारीक नजर ठेवून आहेत कारण अज्ञात व्यक्तींनी त्याच्या काही फांद्या गुप्तपणे तोडल्या आहेत. स्थानिकांना झाडाशी भावनिक ओढ आहे आणि सण-उत्सवात त्याची पूजा करतात.
गावकऱ्यांनी झाडांच्या फांद्या तोडल्याचा ठपका भूमाफियांवर ठेवला आहे. शुक्रवारी ही बाब उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांशी संपर्क साधला.
त्याच दिवशी गावातील एका स्थानिकाचे निधन झाले होते त्यामुळे सर्व गावकरी अंतिम संस्कार करण्यात व्यस्त होते. त्या दरम्यान, झाडाच्या काही फांद्या तोडण्यात आल्याची माहिती मिळाली. झाडाच्या सुमारे पाच ते सहा फांद्या, सुमारे सहा इंच रुंद, कापल्या गेल्या आहेत. असे रहिवासी अजय कुमार म्हणाला. त्याचे हे वडिलोपार्जित गाव आहे आणि त्यांच्या कुटुंबाच्या अनेक पिढ्या येथे राहतात. त्याचे कुटुंब जवळपास दोनशे वर्षापासून या गावात राहत आहे.
हे भूमाफियांचे काम असल्याचा दावा अजय कुमार यांनी केला आहे. ज्या जमिनीवर हे झाड आहे त्यावर निवासी वसाहत उभारली जात आहे. गावकऱ्यांनी झाडासाठी काही जागा सोडण्यास सांगितले आहे तरीही झाडाच्या फांद्या कापल्या आहेत.
ही घटना उघडकीस आल्यापासून गावकरी झाडावर पहारा देत आहेत. दिवस रात्र गावकरी झाडाजवळ बसून राहत आहेत. पोलिसांनी सांगतले की, झाडाच्या आजूबाजूला कोणतीही हालचाल दिसल्यास पोलिसांना त्वरित कळवावे.
हे ही वाचा:
…म्हणून या उमेदवाराला करायचे आहे निवडणुकीतील पराभवाचे शतक!
‘नेताजींच्या जीवनमूल्यांचे अनुकरण करायला हवे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल’
दिल्लीत जानेवारी महिन्यात ३२ वर्षांत सर्वाधिक पाऊस…
अक्कल’शून्य’ कारभारामुळे जमा झाले ३ कोटीऐवजी ३२ कोटी
स्थानिक ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी आणि संबंधित महानगरपालिकेकडे जाण्याचा विचार केला आहे. दरम्यान, या प्रकरणाची माहिती नसल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. वनविभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “ही समस्या आमच्या निदर्शनास आली नाही. या परिसरात कोणालाही झाड तोडण्याची परवानगी नाही. आमच्याकडे काही तक्रार आल्यास आम्ही कारवाई करू.”