25 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरविशेषघरातल्या पदार्थातून टॉमेटो झाला गायब; कोकम, लिंबू, चिंचेला आले महत्त्व

घरातल्या पदार्थातून टॉमेटो झाला गायब; कोकम, लिंबू, चिंचेला आले महत्त्व

रोजच्या स्वयंपाकातील मेनूमध्ये झाला बदल

Google News Follow

Related

टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्यामुळे स्वयंपाक करणाऱ्या गृहिणींच्या कल्पकतेला धार आली आहे. टोमॅटो १२० ते १६० रुपये किलो पोहोचल्याने अनेकांनी त्यांच्या रोजच्या स्वयंपाकातील मेनूमध्ये बदल केला असून टोमॅटोच्या ऐवजी अन्य घटकांचा वापर करून पदार्थ बनवले जात आहेत.

 

कांदिवली येथील निवृत्त बँकर, मीरा पटेल सांगतात, ‘टोमॅटो स्वयंपाकाला तीन कारणांसाठी हवा असतो. ते म्हणजे भाजीची ग्रेव्ही तयार करणे, चवीला खमंगपणा आणि आंबटपणा आणणे आणि आनंददायी लाल रंग. आता टोमॅटोचे दर हाताबाहेर जात असल्याने त्याऐवजी अन्य घटकांचा वापर केल जात आहे. कोणताही एक घटक वरील तिन्ही पर्याय देऊ शकत नाही. मात्र आंबटपणासाठी कोकम, लिंबू, चिंच आणि आमचूर यांचा प्रयोग करता येऊ शकतो. शिवाय दही, बेसन आणि उकडलेल्या बटाटे घोटल्यास ग्रेव्ही घट्ट होऊ शकते. तर, बीटरूट, लाल भोपळी मिरची आणि खाण्याच्या रंगामुळे पदार्थाला लालसरपणा येतो.’

 

ठाण्यातील गृहिणी ऋचा डिसूझा यांनीही त्यांच्या घरात आठवड्यातून एकदा होणारा टोमॅटो रसम हा पदार्थ मेनूमधून वगळला आहे. “मी एरवी टोमॅटोची साल काढून टोमॅटोची प्युरी बनवते आणि त्यात रसम पावडर, मीठ आणि मिरपूड घालते. यासाठी क्वचितच अन्य साहित्याची गरज भासते. परंतु टोमॅटो आवश्यक आहेत,” असे त्यांनी सांगितले. बेसन किंवा दही घालून बनवलेली कढी किंवा डाळ आता लोकप्रिय पदार्थ बनले आहेत. पवई येथील रहिवासी श्वेता जैन म्हणाल्या, “आम्ही स्वयंपाकात चिंचेचा भरपूर वापर करतो. आता लाल ग्रेव्ही करता येणे शक्य नसल्याने काजू, खरबूज बिया, मलई आणि दुधाने बनवलेल्या पांढऱ्या ग्रेव्हींचा मार्ग सुकर झाला आहे. अर्थात काही नसले की, खिचडी-कढीचा बेत ठरलेलाच असतो.’

हे ही वाचा:

गोळवलकर गुरुजींबाबतचे ट्विट दिग्विजय यांना पडणार महागात

प. बंगालमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा; पंचायत निवडणुकीत १८ ठार

आता गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रातही होणार ‘सायन्स सिटी’ 

पाकिस्तानातील नव्या पिढीतील महिलांना आवडते साडी…

विलेपार्ले येथील पाककला तज्ज्ञ अदिती कृष्णा यांनी टोमॅटोच्या मूळाकडे लक्ष वेधले. पोर्तुगीजांनी टोमॅटो भारतात आणले होते. मात्र दक्षिण भारतात, बहुतेक पारंपरिक आणि अस्सल पाककृतींमध्ये टोमॅटोचा उल्लेख आढळत नाही. कोकण पट्ट्यात आंबटपणासाठी कोकम वापरले जाते, तर, केरळमध्ये ‘कोडुमपुल्ली’ आणि तर केरळचा किनारी भाग आणि गोव्यात ‘बिलिंबी’ यांसारखी चिंच आणि स्थानिक फळे हे पारंपरिक आंबट पदार्थ वापरले जातात. मात्र सद्यस्थितीत सांबार, रसम आणि गोवन फिश करीमध्येदेखील टोमॅटो वापरतात,’ अशी माहिती त्यांनी दिली.

बहिणीला वाढदिवसाला दोन किलो टोमॅटोंची भेट

टोमॅटोचे दर वाढल्याने अनेक ठिकाणी टोमॅटोची टंचाई निर्माण झाली आहे. त्यातच कल्याणमधील रहिवासी असलेल्या गौतम वाघने शुक्रवारी आपल्या बहिणीला तिच्या वाढदिवसानिमित्त दोन किलो टोमॅटोची भेट दिली. महिलेच्या काका आणि काकूंनीही तिला प्रत्येकी दोन किलो टोमॅटो भेट दिले. ही अनोखी भेट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा