मी हिंदूंचा गब्बर आहे, चालायला लागलो तर मला बघून लोकं दारं-खिडक्या बंद करतात, असे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले आहे. महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने अहमदनगरमध्ये आज (१ सप्टेंबर) भाजप नेते नितेश राणे यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला. यावेळी सभेला संबोधित करताना नितेश राणे बोलत होते.
नितेश राणे म्हणाले, ज्यांना माझा इतिहास माहिती आहे, त्यांना सर्व माहिती आहे. दाऊद इब्राहिमला आव्हान देणाऱ्यापैकी हे एक राणे कुटुंब आहे, बाकी कोणाच्यात इतकी ताकद नव्हती. वडील नारायण राणे मुख्यमंत्री असताना ६३ एन्काऊंटर करण्याचे आदेश दिले होते, त्यांचा मी मुलगा नितेश राणे आहे. त्यामुळे माझ्या वाकड्यात कोणी जाऊ नका.
हे ही वाचा :
ममता दीदी भेट देईनात, टीएमसी प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा
‘अहंकाराचा महामेरू, मग्रुरीचा कैवारी ही उद्धव ठाकरेंची प्रतिमा’
विद्यार्थ्यांना पारंपारिक वेशभूषा, वस्तू वापरावर बंदी आणल्यास होणार कारवाई
२२ जणांसह बेपत्ता झालेल्या रशियन हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले, १७ मृतदेह ताब्यात !
ते पुढे म्हणाले, हिमतीने उभे राहा, जिद्दीने फिरा, आपल्याला कोणीही काही करणार नाही. आपल्या जिभेला काही हाड आहे, नाही. पाहिजे ते त्यांना बोलतो. त्यांच्या समोरून चालून दाखवतो कोणीही काहीही बोलत नाही. बघून दरवाजे-खिडक्या बंद करतात, जसं काय गब्बर आलाय. ‘मी पण हिंदूंचा गब्बर आहे लक्षात ठेवा’. आपल्या वाकड्यात जायचं नाही, जर एक नितेश राणे हे सर्व करू शकतो तर मला प्रत्येकामध्ये अशी हिंमत झालेली पाहायचं आहे, असे नितेश राणे म्हणाले.