रश्दी यांच्या सॅटॅनिक व्हर्सेससाठी गुगलवर गर्दी

गुगलवर सलमान रश्दी यांचं पुस्तक आणि त्यांच्या संबंधित सर्च ट्रॅफिकमध्ये वाढ झाली आहे.

रश्दी यांच्या सॅटॅनिक व्हर्सेससाठी गुगलवर गर्दी

लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्युयॉर्कमध्ये शुक्रवार, १२ ऑगस्ट रोजी हल्ला झाला होता. पण आता रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय नेटिझन्समध्ये रश्दी यांचे वादग्रस्त पुस्तक ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ याच्याविषयी माहिती मिळण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. साधारण तीन दशकानंतर आता पुन्हा या पुस्तकाच्या चर्चा होत आहेत. भारतात पुस्तकाच्या विक्रीवर बंदी असतानाही गुगलवर पुस्तक आणि लेखक यांच्याशी संबंधित सर्च ट्रॅफिकमध्ये वाढ झाली आहे.

‘सॅटनिक व्हर्सेस डाउनलोड’ या शब्दासाठीचे ट्रॅफिक शुक्रवारी उशिरा सुरू झाले ते कालपर्यंत सुरू होते. प्रादेशिक विश्लेषणाचा विचार करता सर्वाधिक सर्च ट्रॅफिक हे पश्चिम बंगालमधून झाले. त्यापाठोपाठ बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि महाराष्ट्रमधून आल्याचे दिसून आले आहे. सलमान रश्दी यांचे नाव देखील ट्रेंडमध्ये आले होते आणि शुक्रवारी एक दशलक्षाहून अधिक शोधांसह भारतात गुगलवर सर्वाधिक शोधले जाणारे दुसऱ्या क्रमांकाचे हे शब्द होते. “सॅटनिक व्हर्सेस” या शब्दांचे ट्रॅफिक शुक्रवारी रात्री सुमारे ११.३० वाजता जास्त होते तर रविवारी कमी होण्यापूर्वी शनिवारपेक्षा हे ट्रॅफिक जास्त होते. या पुस्तकावर बंदी घालण्यात आल्याने भारतात हे पुस्तक मिळत नाही. पण सेकंडहँड पुस्तके मिळत असलेले ऑनलाइन स्टोअर बुकरने ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितले की, शुक्रवारपासून ट्रॅफिक वाढलं आहे आणि त्याच लेखकाच्या इतर पुस्तकांच्या मागणीत पूर्वीपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

हे ही वाचा:

शिवमोग्गामध्ये सावरकर वि. टिपू सुलतान

७५ विधवा महिलांनी फडकावले ७५ राष्ट्रध्वज

भ्रष्टाचार, घराणेशाहीवर राहुल गांधींची बोलती बंद

पुलवामात दोन दहशतवाद्यांना टिपणाऱ्या देवेंद्र प्रताप सिंह यांना कीर्ती चक्र

जागतिक स्तरावर या पुस्तकाची विक्रीमध्ये जबरदस्त वाढ झाली असून अमेरिकेच्या ऍमेझॉन वेबसाईटच्या बेस्टसेलरच्या यादीत समकालीन साहित्य आणि काल्पनिक कथांच्या श्रेणीत ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ हे प्रथम क्रमांकावर आहे तर एकूण पुस्तकांच्या बेस्टसेलरच्या यादीत १३ व्या स्थानी आहे.

Exit mobile version