‘पेंच व्याघ्र प्रकल्प’ राज्यातील पहिला ‘प्लास्टिक मुक्त’ व्याघ्र प्रकल्प!

प्रदूषण टाळण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापनाने घेतला निर्णय

‘पेंच व्याघ्र प्रकल्प’ राज्यातील पहिला ‘प्लास्टिक मुक्त’ व्याघ्र प्रकल्प!

नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प राज्यातील पाहिला ‘प्लास्टिक मुक्त’ व्याघ्र प्रकल्प ठरला आहे.पर्यटकांकडून जंगलात नेल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू आणि खास करून प्लास्टिक बॉटल्समुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने पर्यटकांच्या प्लास्टिक बॉटल्सवर पेंच मध्ये पूर्णपणे बंदी घातली आहे.त्यामुळे पेंच व्याघ्र प्रकल्प हा मान मिळाला आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या प्रत्येक दारावर रोज शेकडोच्या संख्येने येणाऱ्या पर्यटकाकडून त्यांच्या पाण्याच्या प्लास्टिकच्या बॉटल्स काढून घेतल्या जातात.पेंचच्या व्यवस्थापनाकडून काचेच्या बॉटल्समध्ये शुद्ध आणि थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.विशेष म्हणजे पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या प्रत्येक गेटच्या जवळ पर्यटकांना मुबलक शुद्ध आणि थंड पाणी काचेचे बॉटल्स मध्ये देण्यासाठी छोटे कारखाने स्थापन करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

पीएफआयचे माजी प्रमुख ई अबुबकर यांचा जामीनअर्ज फेटाळला!

उत्तर भारतात उष्म्याचा कहर; दिल्लीत तापमान ५० अंश सेल्सिअसजवळ!

राजकोट गेमिंग झोनमधील आगीत मालकाचाही मृत्यू!

‘पाकिस्तानने भारताशी केलेल्या १९९९च्या लाहोर कराराचे उल्लंघन केले’

या छोट्या कारखान्यांमुळे स्थानिक आदिवासी तरुणांना रोजगाराची संधीही मिळाली आहे. तर दुसऱ्या बाजूला पर्यटकांना गारेगार आणि शुद्ध पाणी प्यायला मिळत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या उपक्रमामुळे जंगलात होणाऱ्या प्लास्टिकच्या प्रदूषणावर नियंत्रण मिळण्याची शक्यता आहे.

देशाच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या नागपूर शहराच्या परिघात ज्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे त्याप्रमाणे अनेक व्याघ्र प्रकल्प देखील आहेत. त्यामुळं वर्षाकाठी लाखो पर्यटक या व्याघ्र प्रकल्पांना भेट देत असून दिवसेंदिवस भेट देणाऱ्या या पर्यटकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.मात्र, संपर्ण जगात भेडसावणारी प्रदूषणाची समस्या आता जंगल आणि व्याघ्र प्रकल्पांना देखील निर्माण झाली आहे.

Exit mobile version