भाजप नेते पेमा खांडू यांनी गुरुवारी (१३ जून) सलग तिसऱ्यांदा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.यांच्यासह चौना मीन यांनी अरुणाचल प्रदेशच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर नेते उपस्थित होते.
पेमा खांडू यांच्यासह अन्य ११ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.दोरजी खांडू कन्व्हेन्शन हॉलमध्ये या शपथविधी सोहळा पार पडला.दरम्यान, पेमा खांडू यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.४४ वर्षीय पेमा खांडू हे ईशान्येकडील राज्यातील भाजपचा प्रमुख चेहरा आहेत.
हे ही वाचा:
डोंबिवली एमआयडीसीमधील ४२ केमिकल कंपन्या बंद करण्याचे आदेश
धक्कादायक! बटरस्कॉच कोन आईस्क्रीममध्ये चक्क सापडले मानवी बोट!
रियासीतील हिंदू हत्याकांडाच्या निषेधार्थ अंधेरीत निदर्शने!
अल्लाह तआला देख लेगा… ‘न्यूज डंका’च्या बातमीसह ‘हा’ मेसेज व्हायरल
२०१६ मध्ये त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.मुक्तो मतदारसंघातून निवडणूक लढवत ते बिनविरोध निवडून आले होते.त्यानंतर २०१९ मध्ये विजय मिळवत पुन्हा मुखमंत्री बनले आणि आज पुन्हा त्यांनी मुखमंत्रीपद कायम ठेवून शपथ घेतली आहे.