पाकिस्तान क्रिकेटमधील समस्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सुरुवातीला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संघाची कामगिरी खूपच खराब होती आणि आता असे वृत्त समोर आले आहे की या आयसीसी स्पर्धेचे आयोजन करणे पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी (पीसीबी) महागडे ठरले आहे, कारण त्यांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. टेलिग्राफ इंडियाच्या वृत्तानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनात पीसीबीला ८६९ कोटी रुपये खर्च करून ८५ टक्के नुकसान सहन करावे लागले.
अहवालांनुसार, पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रावळपिंडी, लाहोर आणि कराची येथील स्टेडियमच्या नूतनीकरणावर सुमारे ५८ दशलक्ष ( ५०० कोटी रुपयांहून अधिक) खर्च केले. हे त्यांच्या सुरुवातीच्या बजेटपेक्षा ५० टक्के जास्त आहे. यानंतर, पीसीबीने स्पर्धेच्या तयारीसाठी ४० दशलक्ष डॉलर्स (सुमारे ३४७ कोटी रुपये) खर्च केले, परंतु त्या बदल्यात त्यांना यजमान शुल्क म्हणून फक्त सहा दशलक्ष डॉलर्स (सुमारे ५२ कोटी रुपये) मिळाले. तिकीट विक्री आणि प्रायोजकत्वातून मिळणारे उत्पन्न खूपच कमी होते. या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की यामुळे पाकिस्तानला कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
हे ही वाचा :
प्रभू राम जन्मभूमी ट्रस्टने गेल्या पाच वर्षात ४०० कोटींचा कर भरला!
वक्फ बोर्डची संपत्ती मुस्लिमांच्या पूर्वजांची
रामजन्मभूमी आंदोलनाला ८ वर्षे लागली, औरंग्याच्या कबरीसाठी पाहू किती वर्षे लागतात?
श्री कृष्णाने अर्जुनला दिलेल्या शिकवणीमधून दिवसभर उर्जा, शांती, समाधान मिळते
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ही गेल्या २९ वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये आयोजित केलेली पहिली जागतिक क्रिकेट स्पर्धा होती. त्यामुळे या स्पर्धेतून पाकिस्तान बोर्डाला मोठ्या नफ्याची अपेक्षा होती, परंतु आता त्यांची परिस्थिती अधिकच वाईट झाली आहे. याचा परिणाम असा झाला आहे की पीसीबीने देशांतर्गत टी-२० खेळाडूंच्या मानधनात मोठी कपात केली आहे. टीम इलेव्हनच्या खेळाडूंच्या शुल्कात ९० टक्के कपात करण्यात आली आहे, तर राखीव खेळाडूंना मागील रकमेच्या फक्त १२.५० टक्के रक्कम मिळत आहे.