हैदराबादचा घरच्या मैदानाशिवाय पहिलाच विजय!

थरारक सामन्यात पंजाबवर दोन धावांनी मात

हैदराबादचा घरच्या मैदानाशिवाय पहिलाच विजय!

हैदराबादने यंदाच्या आयपीएल हंगामात घरच्या मैदानाशिवाय पहिल्यावहिल्या विजयाची नोंद केली. त्यांनी नव्यानेच बांधलेल्या मुल्लानपूर स्टेडिअममध्ये पंजाबवर मात करून दोन गुणांची कमाई केली. शेवटच्या षटकापर्यंत थरारक झालेल्या सामन्यात हैदराबादचा अवघ्या दोन धावांनी विजय झाला. पंजाबचे तळाचे फलंदाज शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांनी विजयाच्या आशा वाढवल्या होत्या. मात्र ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.

पंजाबला शेवटच्या तीन षटकांत ५१ धावा हव्या असल्याने संघाने विजयाच्या आशाच सोडून दिल्या होत्या. मात्र शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांनी २७ चेंडूंत ६६ धावांची दमदार भागीदारी केली. शेवटच्या षटकात विजयासाठी २९ धावांची गरज होती. अशा वेळी पॅट कमिन्सने जयदेव उनाडकटवर विश्वास ठेवला. पंजाबच्या या जोडीने शेवटच्या षटकात २७ धावा केल्या. मात्र विजयासाठी त्यांना तीन धावा कमी पडल्या.

हे ही वाचा:

नरेंद्र मोदींसाठी मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा

‘मोदी सरकारच्या काळात चीन एक इंचही जमीन काबीज करू शकला नाही’

ईडीने सादर केलेल्या पुराव्यांनुसार अरविंद केजरीवालांची अटक योग्य

‘काँग्रेसच्या मनात विष, राम नावाचा तिरस्कार करते इंडी आघाडी’!

२० वर्षीय नितीशकुमार रेड्डीची फलंदाजी आणि सर्व गोलंदाजांची भेदक गोलंदाजी याच्या जोरावर हैदराबाद सहा गुणांनिशी पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.पंजाबची अवस्था १६व्या षटकात सहा बाद ११४ अशी होती. तेव्हा शशांक आणि आशुतोषची जोडी मैदानावर उतरली. तत्पूर्वी सलामीवीर शिखर धवन (१४) आणि जॉनी बेअरस्टो झटपट बाद झाले. पंजाबची अवस्था तीन बाद २७ अशी झाली होती. सॅम कुरन (२९ चेंडूंत २२) आणि सिकंदर रझा (२८) यांनी खेळात रंग भरला. मात्र कुरन १०व्या षटकात बाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या शशांकने रझाच्या साथीने धावफलक हलता ठेवला.

नितिश कुमार रेड्डीची चमक
२० वर्षीय नितीश कुमार रेड्डीच्या फलंदाजीमुळे हैदराबादला नऊ बाद १८२ अशी मजल मारता आली. एडन मार्करम, ट्रेव्हिस हेड आणि हेन्रिच क्लासेन हे दमदार फलंदाज निष्प्रभ ठरले. मात्र तरुण नितिश आणि अब्दुल समाद यांनी चांगली खेळी केली. हेड आणि अभिषेक यांनी चांगली सुरुवात करून दिली. मात्र अर्शदीप सिंगने हेडची विकेट घेतली. त्यानंतर अर्शदीपने त्याच षटकात एडन मार्करमला बाद केले. तेव्हा हैदराबादची अवस्था दोन बाद २७ अशी झाली होती. अभिषेक शर्माने एक षटकार आणि दोन चौकार लगावले. मात्र कुरनने त्याला बाद केले. नितिश कुमारच्या ३७ चेंडूंत ६४ धावांमुळे हैदराबादला चांगली धावसंख्या उभारता आली.

Exit mobile version