पय्याडे स्पोर्ट्स क्लब आणि वेंगसरकर अकादमीची दमदार कामगिरी

संतोष कुमार घोष ट्रॉफी (१६ वर्षाखालील) क्रिकेट स्पर्धा

पय्याडे स्पोर्ट्स क्लब आणि वेंगसरकर अकादमीची दमदार कामगिरी

पय्याडे स्पोर्ट्स क्लब आणि दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी या संघांनी दहाव्या संतोष कुमार घोष ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेमध्ये आज पहिल्या दिवशी शानदार खेळ करत आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर वरचष्मा प्रस्थापित केला. वंश अकबरी नाबाद १०९ याच्या अप्रतिम खेळीमुळे पय्याडेने ८५ षटकांमध्ये ८ बाद ३०८ अशी मोठी धावसंख्या उभारून गावदेवी क्रिकेटर्सविरुद्ध जबरदस्त आव्हान उभे केले. दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीने एमआयजी (वांद्रे) यांचा केवळ ४२.४ षटकांत ८१ धावांमध्ये खुर्दा पाडला. त्यानंतर त्यांनी दिवसअखेरीस २ बाद १३५ असा पल्ला गाठत सामन्यावर मजबूत पकड घेतली. त्यांचा ओमकार पाटणकर ६९ धावांवर खेळत आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने या स्पर्धेचे आयोजन स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल फाउंडेशन यांनी शिवाजी पार्कवर केले आहे.आज या स्पर्धेचे उद्घाटन एमसीएचे नवनिर्वाचित सचिव अजिंक्य नाईक यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी आयोजिका अरुंधती घोष, एमसीएचे सदस्य अभय हडप तसेच हेमांगी नाईक लक्ष्मीकांत अमृतकर, हेमंत पेडणेकर हे उपस्थित होते. या स्पर्धेला अजिंक्य नाईक, संजय नाईक आणि सूरज सामत यांचे सहकार्य लाभले आहे.

हे ही वाचा:

…आणि तो अचानक तिरडीवर उठून बसला

विराट, सूर्याचे रॉकेट, राहुलचा फुसका बार तर रोहितची आतषबाजी

एलॉन मस्क वॉश बेसिन घेऊन पोहचले ट्विटर कार्यालयात

अवघ्या तीन रुपयांसाठी महिलेची केली हत्या

 

स्कोअरबोर्ड :

पय्याडे स्पोर्ट्स: ८५ षटकात ८ बाद ३०८( वंश अकबरी खेळत आहे १०९, जय व्यास ४६, आदित्य विश्वकर्मा ३४, शौर्य शरण ३३, आरव मल्होत्रा ६१ धावांत ५ बळी) विरुद्ध गावदेवी क्रिकेटर्स

एमआयजी क्लब : ४२.४ षटकांत ८१ (अमर्त्य राजे ४८, दर्श मुरकुटे २२ धावांत ३ बळी अनिरुद्ध नायर १५ धावा दोन बळी) विरुद्ध वेंगसरकर क्रिकेट अकादमी : २ बाद १३५ ( ओंकार पाटणकर खेळत आहे ६९, अस्मित कश्यप २७, रोहन करंदीकर २५)

मुंबई पोलीस जिमखाना : ७७ षटकांत ७ बाद २०४ ( जयनिल नंदा ७३, आर्यन प्रभाकर ४३, जोशी राऊत २६, अथर्व कांबळे ४२) विरुद्ध कामत मेमोरियल

साईनाथ स्पोर्ट्स क्लब : ७५.३ षटकांत १५१ (सारांश शर्मा ४४, आदिल शेख २७, आरी गायकवाड ४७/४) विरुद्ध स्पोर्ट्सफिल्ड क्रिकेट क्लब : बिनबाद ४७ (वसीम खान खेळत आहे २६)

गे कव्हेलियर्स : ५१.५ षटकांत २०५ ( लोकेश मिस्त्री ४१, हर्षवर्धन ५८, शिवानंद नाडर ४१/६) विरुद्ध शिवाजी पार्क जिमखाना ७ बाद ७० (आर्य कर्ले २५, कार्तिकेय शुक्ला १९/४)

बॉम्बे वाँडरर्स : ४६.१ षटकांत ९६ (समृद्ध भट २६, राज वायंगनकर २६, श्रमिक शेट्टीगर १६/५) विरुद्ध स्पोर्टिंग युनियन: ४ बाद १६३ (आयुष मकवाना खेळत आहे ७४, वेदांत टोकरानी खेळत आहे ५२)

Exit mobile version