पावनखिंडला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद

पावनखिंडला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद

दीग्पाल लांजेकर यांचा बहुप्रतिक्षित पावनखिंड चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तिकीट बारीवर हा चित्रपट चांगलाच धमाका करणार असल्याची चर्चा सुरुवातीपासूनच रंगली होती. त्याप्रमाणे आता चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती लागताना दिसत आहेत.

पुण्यातील वडगाव शेरी भागातील बॉलीवूड ई स्टार या चित्रपटगृहात पावनखिंड या चित्रपटाचा पहिला शो हाऊसफुल गेला आहे. सकाळी नऊ वाजता हा शो सुरू झाला. उद्या म्हणजेच १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे, याचाही या चित्रपटाला चांगला फायदा होईल असे मानले जात आह.  त्यासाठीच हा चित्रपट आज म्हणजे १८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित करण्यात आल्याचे समीक्षकांचे मत आहे.

हे ही वाचा:

‘गायब झालेल्या बंगल्यांची चौकशी व्हायला हवी’

‘कुराणात हिजाब अनिवार्य आहे असे म्हटल्याचा पुरावा द्या!’

अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी ३८ दोषींना फाशी

पत्रकारपरिषदेनंतर नारायण राणेंना मुंबई महापालिकेकडून नोटीस  

चित्रपट प्रदर्शित होण्या आधीच या चित्रपटाने अनेक विक्रम रचले आहेत. या चित्रपत्राचे ट्रेलर प्रदर्शनापूर्वीच तब्बल ६५ लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे. अशा प्रकारचा विक्रम करणारा हा पहिला मराठी चित्रपट आहे. चित्रपटात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, क्षिती जोग, हरीश दुधाडे, अजय पुरकर, प्राजक्ता माळी अशा अनेक नामवंत कलाकारांनी भूमिका केल्या आहेत.

‘पावनखिंड’ या नावावरुनच चित्रपटाचा विषय काय आहे हे लक्षात येते पण दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांनी या संपूर्ण विषयाची मांडणी फारच सफाईदार पद्धतीने केली आहे. बाजीप्रभू देशपांडे यांच्या नेतृत्वात मोघलांच्या फौजे विरोधात लढा देणाऱ्या या ६०० मावळ्याची विरगाथा रुपेरी पडद्यावर बघताना प्रत्येकाचा ऊर अभिमानाने भरून येईल.

Exit mobile version