पवनदीप झाला इंडियन आयडल

पवनदीप झाला इंडियन आयडल

सोनी वाहिनीवरील प्रसिद्ध अशा इंडियन आयडल या सिंगिंग रियालिटी शो चा निकाल आता लागला आहे. पवनदीप राजन हा या वेळचा इंडियन आयडल ठरला आहे. त्याला या विजयासाठी बक्षीस म्हणून २५ लाख रुपये, एक ट्रॉफी आणि एक गाडी मिळाली आहे.

गेले नऊ महिने सोनी वाहिनीवर इंडियन आयडल हा प्रसिद्ध सिंगिंग रियालिटी शो सुरू होता. या कार्यक्रमाचे हे १२ वे पर्व होते. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकूण सहा स्पर्धक पोहोचले होते. यामध्ये तीन पुरुष स्पर्धक, तर तीन महिला स्पर्धक होत्या. मोहम्मद दानिश, निहाल आणि पवनदीप राजन असे तीन पुरुष स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले होते. तर महिलांमधून अरूणीता कांजिलाल, सायली कांबळे आणि शण्मुखाप्रिया या तिघी जणी अंतिम फेरीत दाखल झाल्या होत्या.

हे ही वाचा:

आज काबुलकडून दिल्लीला येणार शेवटचे विमान

मल्लखांबाचा ऑलिम्पिक मार्ग व्हाया जपान

पंतप्रधान मोदींची लाल किल्लयावरून ‘सबका प्रयास’ची हाक

महाराष्ट्राच्या मंत्रालयाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

या संपूर्ण कार्यक्रमाला ‘ग्रेटेस्ट टॅलेंट एव्हर’ असे म्हटले जात होते. या कार्यक्रमाचे परीक्षण हिमेश रेशमिया, नेहा कक्कर, विशाल दादलानी हे करत होते. तर कालांतराने विशाल आणि नेहा कक्करची जागा अनु मलिक आणि सोनू कक्कर यांनी घेतली.

आज भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला ग्रेटेस्ट ग्रँड फिनाले असे म्हटले गेले होते. कारण दुपारी बारा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजे तब्बल बारा तास हा महाअंतिम सोहळा चालला. रात्री बारा वाजता या स्पर्धेचा निकाल लागला असून पवनदीप राजन, अरूणीता कांजिलाल आणि सायली कांबळे हे सर्वोत्तम तीन स्पर्धक ठरले. त्यापैकी पवनदीप राजन याला बाराव्या पर्वाचे इंडियन आयडल घोषित करण्यात आले.

Exit mobile version