उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा ७ वर्षांचा मुलगा आगीच्या कचाट्यात!

सिंगापूरमधील रुग्णालयात उपचार सुरु

उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा ७ वर्षांचा मुलगा आगीच्या कचाट्यात!

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता पवन कल्याण यांचा ७ वर्षांचा मुलगा मार्क शंकर सिंगापूरमधील एका शाळेत लागलेल्या आगीत जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात त्याच्या हाता-पायांना दुखापत झाली आहे. तर धुरामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होत आहे. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचे कुटुंब चिंतेत आहे. दरम्यान, सध्या मार्क शंकर सिंगापूरमधील रुग्णालयात उपचार घेत आहे.  त्याच वेळी, अल्लुरी जिल्ह्याचा दौरा पूर्ण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पवन कल्याण सिंगापूरला रवाना होणार आहेत.

जनसेना पक्षाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंगापूरमधील एका शाळेच्या आवारात अचानक आग लागल्याने ही घटना घडली. दिलासा देणारी गोष्ट म्हणजे शाळेतील कर्मचाऱ्यांनी ताबडतोब मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु शंकर आगीत अडकला. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

पवन कल्याण आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ही बातमी पसरली. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना सिंगापूरला जाण्याचा सल्ला दिला, परंतु पवन कल्याण म्हणाले की त्यांना आदिवासी भागात दिलेली आश्वासने प्रथम पूर्ण करायची आहेत. वेळापत्रकानुसार, त्यांनी अराकू जवळील कुरिडी गावाला भेट दिली, जिथे त्यांनी विकास योजनांचे उद्घाटन केले आणि ग्रामस्थांच्या समस्या ऐकल्या. पक्षाच्या म्हणण्यानुसार, ते त्यांचा दौरा संपवतील आणि लवकरच विशाखापट्टणमहून सिंगापूरला रवाना होतील.

हे ही वाचा  : 

बांगलादेशाची अफगाणिस्तानच्या दिशेने वाटचाल? KFC, Pizza Hut, Bata वर जबर हल्ले

पाकिस्तानात मसूद अझहरच्या सहकाऱ्याची गोळ्या घालून हत्या

बुंदेलखंडच्या राय लोकनृत्याला जागतिक ओळख देणारे पद्मश्री राम सहाय पांडे यांचे निधन

हुर्रियत कॉन्फरन्सशी संबंधित तीन गटांनी सोडला फुटीरतावादाचा मार्ग

दरम्यान, आंध्र प्रदेशचे शिक्षण आणि आयटी मंत्री नारा लोकेश यांनीही चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “सिंगापूरमधील शाळेत आग लागल्याची बातमी ऐकून धक्का बसला, ज्यामध्ये पवन कल्याण जी यांचा मुलगा भाजला गेला आहे. मी त्यांना लवकर आणि पूर्ण बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो.

सध्या सिंगापूर प्रशासन या घटनेची चौकशी करत आहे आणि शाळा व्यवस्थापनाकडूनही परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा परदेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय मुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाचा चुथडा कुणी केला? | Mahesh Vichare | Deenanath Mangeshkar Hospital

Exit mobile version