आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि जनसेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांनी अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यातील एका गावातील सर्व रहिवाशांना चप्पल पाठवल्या आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या या कृतीमुळे अनेकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी अराकू आणि डुंबरीगुडा प्रदेशांच्या अलीकडील दोन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान स्थानिक समस्या समजून घेण्यासाठी एएसआरच्या डुंबरीगुडा मंडलमधील पेडापाडू गावाला भेट दिली होती.
यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधत असताना, त्यांना पांगी मिठू नावाची एक वृद्ध महिला भेटली जिच्या पायात चपला नव्हत्या. तसेच गावातील अनेक लोक अनवाणी चालत असल्याचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण दिसून आले. यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी लगेच गावाच्या लोकसंख्येची माहिती घेतली. तिथे सुमारे ३५० लोक राहत असल्याचे कळताच त्यांनी त्यांच्या कार्यालयाला प्रत्येकासाठी चप्पलची व्यवस्था करण्यास सांगितले. यानंतर लवकरच गावातील सर्व रहिवाशांना चपला वितरित करण्यात आल्या.
हे ही वाचा :
५० कोटींचा कुत्रा म्हणून जगभर मिरवला, ईडीने छापा टाकताच भलतेच कारण आले समोर!
छत्तीसगडमध्ये ३३ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; १७ जणांवर ४९ लाखांचे बक्षीस
तेलंगणातील काँग्रेस नेत्याने गमावले संतुलन; केंद्रीय मंत्र्याला दिल्या शिव्या!
उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या कृतीमुळे भारावून गेल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले, आमचे पवन सर आले आणि त्यांनी आमचे संघर्ष ओळखले. ते पुढे म्हणाले, यापूर्वी इतर कोणत्याही नेत्याने त्यांना भेट दिली नव्हती किंवा त्यांच्या समस्यांची दखल घेतली नव्हती. उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीबद्दल सर्व गावकऱ्यांनी आभार मानले आणि कौतुक केले.