भारत आणि चीन यांच्यात गेली अनेक वर्षे सीमावादाचा मुद्दा होता. यानंतर या दोन्ही देशांमध्ये करार झाल्यानंतर भारतीय सैन्याने शुक्रवार, १ नोव्हेंबर रोजी पासून पूर्व लडाखमधील डेमचोक सेक्टरमध्ये गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. डेमचोक आणि डेपसांग सेक्टरमधील वास्तविक नियंत्रण रेषेबद्दलच्या करारानुसार हे नवे अपडेट समोर आले आहेत.
पूर्व लडाखमधील डेमचोक सेक्टरमध्ये शुक्रवारपासून भारतीय जवानांची गस्त सुरू झाली आहे. डेपसांग सेक्टरमध्ये गस्त लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे, असे भारतीय लष्कराने सांगितले आहे. समन्वित गस्त म्हणजे दोन्ही बाजूंना गस्तीचे वेळापत्रक माहिती असेल. याआधी गुरुवारी दिवाळीनिमित्त लडाख सेक्टरमधील विविध सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्याने मिठाईची देवाणघेवाण केली. लडाखमधील हॉट स्प्रिंग्स, काराकोरम पास, दौलत बेग ओल्डी, कोंगकला आणि चुशुल-मोल्डो सीमा बैठक बिंदू येथे भारतीय आणि चिनी सैन्याने मिठाईची देवाणघेवाण केली.
लडाखचे खासदार हाजी हनीफा यांनी पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारतीय आणि चिनी सैन्यांमधील मत मिटल्याचे स्वागत केले. आपल्यापैकी जे सीमेजवळ राहतात त्यांना युद्ध कसे वाटते हे माहित आहे. आम्हाला सीमेवर शांतता हवी आहे. आम्ही दोन्ही देशांमधील कराराचे स्वागत करतो, परंतु आम्ही जमिनीवर त्याची अंमलबजावणी पाहू इच्छितो, असे ते म्हणाले.
हे ही वाचा :
‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूच काम करतील’
१८ हिंदुंवर देशद्रोहाचा गुन्हा !
ट्रम्प यांच्याकडून अमेरिकेतील हिंदूंचे रक्षण करण्याचे आश्वासन
मुस्लिम पुरुषाने हिंदू असल्याचे भासवून हिंदू महिलेशी केले लग्न
भारतातील चीनचे राजदूत झू फीहाँग म्हणाले की, शेजारी देश म्हणून भारत आणि चीनमध्ये मतभेद असणे स्वाभाविक आहे परंतु हे मतभेद कसे हाताळायचे आणि सोडवायचे हे महत्त्वाचे आहे. भारत आणि चीनने अलीकडेच भारत-चीन सीमेवर LAC वर गस्त व्यवस्थेवर एकमत केले आहे. २०२० मध्ये LAC च्या बाजूने पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद सुरू झाला, चीनच्या लष्करी कारवाईमुळे सुरू झाला. या घटनेमुळे दोन्ही राष्ट्रांमध्ये दीर्घकाळ तणाव निर्माण झाला आणि त्यांचे संबंध लक्षणीयरित्या ताणले गेले.