राज्यात कोविड फोफावलेला असतानाच म्युकोरमायकॉसिसचा धोका अधिक बळावला आहे. माणसाच्या मेंदुवर गंभीर परिणाम करणारा आणि अतिशय प्राणघातक अशा या आजाराने आता कोविडमधून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये आपले हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. राज्यात आत्तापर्यंत सुमारे २००० रुग्णांना म्युकोरमायकॉसिसची लागण झाली आहे.
करोना रुग्णांना मधुमेहासारखी सहव्याधी असेल आणि त्यांचा मधुमेह नियंत्रित नसेल तर त्यांच्यामध्ये म्युकोरमायकॉसिस हा बुरशीजन्य आजार आढळून येऊ शकतो. सुरूवातीला नाकाजवळ, ओठाजवळ काळसर ठिपका या आजारात आढळून येतो. त्यानंतर हा आजार फैलावत जातो. मात्र हा आजार फुप्फुसे किंवा मेंदुपर्यंत पोहोचल्यास रुग्णाच्या बचावण्याची शक्यता नसल्यात जमा होते.
हे ही वाचा:
सलग दुसऱ्या दिवशी देशातील कोविड रुग्णसंख्येत घट
कोविशिल्ड लसीमुळे मृत्युचा धोका ८० टक्क्यांनी कमी
सामनाचा अग्रलेख म्हणजे खाली डोकं वर पाय
काँग्रेस पक्ष कांगावखोर, कद्रू, नकारात्मकता पसरवणारा
या आजारामुळं राज्यात आजपर्यंत दोन हजार जणांना लागण झाली आहे तर, ८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं या रोगासाठी विशेष वॉर्डची व्यवस्था करण्यात येत आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
या आजारावर उपचार हा महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून करण्याचा निर्यण घेण्यात आला आहे, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या आजारावरील उपचार मोफत होणार आहेत.
या आजारावरील औषधे एमपी-एंपोथेरिसीन सर्वत्र उपलब्ध आहेत. मात्र, मागणी वाढल्यामुळं या औषधाच्या किंमती अडीच हजार रुपयांवरुन थेट सहा हजार रुपयांवर पोहोचल्या आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांना ते परवडणारे नाही, हे लक्षात या औषधांचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत केला जणार आहे.