मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार सुरू

मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार सुरू

अहमदनगरमधील हृदयद्रावक प्रसंग

महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान चालू आहे. राज्यात ठिकठिकाणी रुग्णांना बेड्स मिळत नसल्याच्या घटना घडल्या आहेत. अहमदनगरमध्ये बेड्सच्या अभावामुळे रुग्णांना मृतदेहांशेजारी झोपवावे लागण्याची मन विषण्ण करण्याची घटना घडली आहे.

टाईम्स नाऊ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार अहमदनगरमधील रुग्णालयातील मन विषण्ण करणारी ही घटना समोर आणली आहे. यामुळे राज्याती आरोग्यव्यवस्था पार कोसळली असल्याचे दिसत आहे. रुग्णांना आणि मृतदेहांना एकाच खाटेवर ठेवले जाण्याची अतिशय हृदयद्रावक घटना घडली आहे.

हे ही वाचा:

सौदी अरेबियातील विद्यार्थी गिरवतायंत रामायण, महाभारताचे धडे

गोलंदाज वेंकटेश प्रसाद म्हणतो हनुमान चालिसा

भाजपा साजरा करणार ऑनलाईन विजयोत्सव

…आणि चिदंबरम यांच्यावर लोक चिडले!

यावरून भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट केले आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीट मधून या बाबत संताप आणि विषण्णता व्यक्त केली आहे ते ट्वीटमध्ये म्हणतात,

बेडसच्या कमतरतेमुळे अहमदनगरमध्ये रुग्णांना मृतदेहांसोबत एकाच खाटेवर झोपावे लागत असल्याची मन विषण्ण करणारी बातमी आली आहे. याला काय म्हणावे? मृतदेहाची अवहेलना की आयुष्याची घुसमट?

राज्यात सध्या कोविडमुळे आरोग्य व्यवस्थेवर न भूतो न भविष्यती असा ताण आला आहे. ठिकठिकाणी वेगवेगळ्या वैद्यकीय सुविधांची चणचण भासत आहे. त्यासाठी समाजातील अनेक स्तरांतून त्याचप्रमाणे विदेशातूनही मोठ्या प्रमाणात मदत पाठवली जात आहे. त्याबरोबरच केंद्र सरकारने १ मे पासून मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

Exit mobile version