महाराष्ट्रात गेले काही महिने कोविडने थैमान घातले होते. त्यामुळे राज्यात चिंतेचे सावट होते. मात्र त्यातून महाराष्ट्राला दिलासा मिळाला आहे. आज महाराष्ट्राची कोविड रुग्णवाढ ५० हजाराच्या खाली राहिली आहे. त्यासोबतच रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात तब्बल १२ जिल्ह्यांना यश आलं आहे.
गेल्या चोविस तासात महाराष्ट्रात एकूण ४८,६२१ नवे रुग्ण आढळले तर ५९,५०० रुग्णांनी कोरोनावर मात केली. मात्र गेल्या चोविस तासात ५६७ रुग्णांचा मृत्यु झाला. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.७ टक्क्यांवर गेले आहे.
हे ही वाचा:
११ कोटी लसींकरता केंद्राने मोजले १७३२ कोटी
नागपूरच्या रुग्णालयात कोरोना रुग्णांची लूट
रायगड एमआयडीसीत शिवसेना-राष्ट्रवादीत राडा
लॉकडाउनच्या काळात नवे स्पुतनिक स्कॅम
ज्या १२ जिल्ह्यांना कोरोना रुग्णवाढीचा वेग आटोक्यात आण मुंबई, ठाणे अव्वल आहेत. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद, लातूर, नांदेड, वाशिम, भंडारा, गोंदिया या १२ जिल्ह्यांनी कोरोना रुग्णवाढीवर लगाम घालण्याची कमाल करून दाखवली आहे.
कोरोनाचे निदान होण्यासाठी सीटी स्कॅन केला जातो. मात्र वारंवार सीटी स्कॅन करणे धोकादायक असल्याचे मत एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे. सातत्याने सीटी स्कॅन करणे हानिकार असते. सातत्याने सीटी स्कॅन केल्याने कर्करोगाचा धोका बळावतो. त्यामुळे कोरोनाच्या सौम्य लक्षणांत सीटी स्कॅन करून नये असा सल्ला त्यांनी दिला आहे.