पुण्यातील ससून रुग्णालय मागील काही दिवसांपूर्वी चांगलंच चर्चेत होतं.आता पुन्हा चर्चेत आलं आहे परंतु यावेळी कारण मात्र वेगळं आहे.ससून रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या तरुणाचा उंदीर चावल्यामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.या प्रकारामुळे नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
सागर रेणूसे (३०) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.या तरुणाचा पुण्यातील भोर तालुक्यात अपघात झाला होता. त्यानंतर त्याला १६ मार्चला त्याला ससुन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आणि आयसीयुमध्ये त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले. उपचार सुरु असताना २६ तारखेला त्याची प्रकृती अधिकच खालावली.यामागील शोध घेतला असता तरुणाला उंदीर चावल्याचं समोर आलं.आयसीयुमध्ये तरुणाच्या डोक्याला, कानाला आणि इतर अवयवांना उंदराने चावा घेतला होता.या प्रकारामुळे नातेवाईकांनी एकच गोंधळ घातला.
हे ही वाचा:
ख्रिश्चन धर्म स्वीकाराण्यासाठी आर्थिक आमिष
केजरीवाल ‘आत’ गेल्यावर आता संजयसिंग ‘बाहेर’
कुराण जाळणाऱ्या इराकच्या सलवान मोमिकचा मृत्यू?
देश पेटविण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसचा देशातून सफाया करा!
उंदराच्या चावामुळे तरुणाची प्रकृती खालावत जाऊन आज (२ एप्रिल) सकाळी त्याचा मृत्यू झाला.तरुणाच्या मृत्यूने नातेवाईकांनी संताप व्यक्त करत उंदराच्या चावामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला.सुरवातीला काही वेळ डॉक्टरांनी नकार दिला. मात्र त्यानंतर डॉक्टरांनी तरुणाच्या शरीरावर उंदीर चावल्याच मान्य केलं.दरम्यान, तरुणाचे नातेवाईक यापुढे कोणते पाऊल उचलतील हे पाहणं महत्वाचं असेल.