घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णाचे उंदराने डोळे कुरतडल्यामुळे मंगळवारी खळबळ उडाली होती. पण त्या रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाला. त्यामुळे पालिका रुग्णालयातील अव्यवस्थेचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे.
बुधवारी श्रीनिवास यल्लप्पा या रुग्णाचा संध्याकाळी ६ वाजता मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. गेल्या काही दिवसांपासून येल्लप्पा यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांना मेंदूज्वर होता तसेच त्याचे यकृतही खराब झाले होते.
हे ही वाचा:
प्रदीप शर्मा यांचे फाउंडेशन एनआयएच्या रडारवर
दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला एनसीबीकडून अटक
झाड कापण्यासाठी पालिकेचा सोसायटीच्या खिशावर दरोडा
महापालिकेच्या माध्यमातून मुंबईला कुरतडणाऱ्या ‘उंदरांचा’ बंदोबस्त करावा लागणार
मंगळवारी त्याच्या डोळ्याचा काही भाग उंदराने कुरतडल्याचे समोर आले होते. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली. मंगळवारी सकाळी हा सारा प्रकार समोर आला आहे. श्रीनिवास याचे नातेवाईक त्याला बघण्यासाठी राजावाडी रुग्णालयात गेले असताना श्रीनिवासच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे त्यांना दिसले. हे रक्त पाहून सर्वांनाच धक्का बसला. हा सारा प्रकार वेगळाच असल्याचे त्यांच्या लक्षात आले म्हणून जवळ जाऊन नीट पाहिले असता श्रीनिवासचे डोळे उंदरांनी कुरतडल्याचे त्यांना समजले.
विरोधी पक्षांनीही त्यावरून रान उठविले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रुग्णालयाला भेट देऊन त्या रुग्णाची विचारपूस केली.
रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. येल्लप्पा यांची बहीण रुग्णालयाबाहेर उभी होती, पण तिला श्रीनिवास यांना भेटू दिले जात नव्हते. अखेर रात्री त्यांचे निधन झाल्याची बातमी रुग्णालयाकडून त्यांच्या बहिणीला देण्यात आली.
पालिकेच्या रुग्णालयात अशा वारंवार घडणाऱ्या घटनांत आता आणखी एका घटनेची भर पडली आहे.