इंग्लंडविरोधातील दोन कसोटी सामन्यांसाठी विराट कोहलीऐवजी राजन पाटिदार याच्या केलेल्या निवडीचे माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी स्वागत केले आहे. तसेच, भारत ही कसोटी मालिका ४-१ने जिंकेल, असा विश्वासही त्यांनी केला आहे.
भारताच्या मैदानावर इंग्लंडविरोधातील भारताची कामगिरी चांगली राहिली आहे. भारताने घरच्या मैदानावर कसोटी सामना गमावला, त्यालाही १० वर्षे लोटली आहेत.
त्यामुळे घरच्या मैदानावर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत ऐतिहासिक १७वा कसोटी सामना नक्की जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र वैयक्तिक कारणास्तव विराट कोहली पहिले दोन कसोटी सामने खेळणार नाही. त्यामुळे त्याच्या जागी राजन पाटिदार याची निवड झाली आहे. राजन पाटिदार याने इंग्लंड लायन्सविरोधात १५८ चेंडूंत १५१ धावांची दमदार खेळी करून कसोटी संघात स्थान मिळवले आहे. नऊ वर्षांच्या कारकिर्दीत राजन याने ४५च्या सरासरीने ५४ प्रथम श्रेणी सामन्यांमधून चार हजार धावा केल्या आहेत.
हे ही वाचा:
कांदिवली: १८ ते २५ वयोगटातील नवीन मतदारांशी पंतप्रधान साधणार संवाद!
इंडी आघाडीला मैत्रीपूर्ण “खंजीरा”चा महामंत्र
युक्रेनच्या सीमेजवळ रशियन विमान कोसळले, ६५ जणांचा मृत्यू!
मनोज जरांगेंना न्यायालयाकडून नोटीस; आझाद मैदानात ५ हजारहून अधिक लोक जमण्यास मज्जाव
द रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज असणाऱ्या राजन याने डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या एकदिवसीय संघात पदार्पण केले होते. तिशी उलटल्यानंतर भारतीय संघात पदार्पण करणारा राजन हा सन २०००पासूनचा सातवा खेळाडू असेल. पण तो अंतिम ११ जणांमध्ये स्थान मिळवू शकेल का, याबाबत कुंबळे यांना विचारले असता, कदाचित त्याच्या ऐवजी श्रेयस अय्यर यालाच खेळवले जाईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. ‘राजन याने गेल्या काही वर्षांत चांगला खेळ दाखवला आहे. तरुण मुलांचे पुनरागमन पाहून आनंद होतो.
इंग्लंड लायन्सविरोधातील सामन्यात जेव्हा भारतीय अ संघ संकटात होता, तेव्हा त्याने शतक ठोकले. त्यामुळे त्याची निवडकर्त्यांनी बदली खेळाडू म्हणून निवड केली आहे. मात्र तो उद्या खेळेल का, याबाबत मला शंका आहे. मला वाटते, त्याच्याऐवजी श्रेयस अय्यरला संधी दिली जाईल. संघ व्यवस्थापनाने हे स्पष्ट केले आहे की, के. एल. राहुल यष्टीरक्षण करणार नाही. म्हणजे कदाचित श्रेयस चौथ्या क्रमांकावर येईल. मग कदाचित राहुल पाचव्या आणि के. एस. भारत पाचव्या क्रमांकावर असेल,’ असा अंदाज कुंबळे यांनी वर्तवला आहे.