पतंजलीच्या पुढाकाराने नवे कोविड सेंटर

पतंजलीच्या पुढाकाराने नवे कोविड सेंटर

योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली योगपीठाच्या पुढाकाराने उत्तराखंडमध्ये कोविड रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. उत्तराखंड सरकार आणि पतंजली योगपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हे सेंटर सुरु करण्यात आले. मंगळवार, ६ मे रोजी उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांच्या हस्ते आणि बाबा रामदेव यांच्या प्रमुख उपस्थितीत या सेंटरचे उद्घाटन झाले.

भारतात सध्या कोविडचा हैदोस सुरु आहे. भारतात सध्या दिवसागणिक लाखो रुग्ण या कोविडच्या कचाट्यात येत आहेत. या सार्यामुळेच भारताच्या आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे. अनेक ठिकाणी कोवीड रुग्णांना बेड्सची कमतरता जाणवत आहे. अशातच आता उत्तराखंड राज्याच्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. उत्तराखंडमधील हरिद्वार येथे पतंजली योगपीठ आणि उत्तराखंड सरकारच्या संयुक्त विद्यमाने एका नव्या कोविड सेंटरचा शुभारंभ झाला आहे.

हे ही वाचा:

‘मुंबई पोलिस रश्मी शुक्लांना अटक करू शकत नाहीत’

शिवसेना नेत्याचा ‘बड्डे’, कोविड नियमावलीचे तीन तेरा

कोविड लसींना पेटंटच्या पिंजऱ्यातून सोडवण्यास अमेरिकेचा पाठिंबा

खुशखबर!! आरोग्य खात्यात भरणार १६ हजार पदे

हरिद्वारमध्ये सुरु झालेल्या या नव्या कोविड सेंटरची क्षमता १४० बेड्सची आहे. हे सारे बेड्स हे ऑक्सिजन बेड्स आहेत. यापैकी १० इमर्जंसी बेड्स आणि ४ व्हेंटीलेटर्स बेड्स आहेत. याच वेळी हरिद्वार कोवीड पोर्टल आणि प्रीपेड अँब्युलंस सेवेचाही शुभारंभ करण्यात आला आहे. या नव्या कोविड सेंटरचे कर्मचारी, निवास, साफसफाई, भोजन या सर्व गोष्टींची व्यवस्था पतंजली योगपीठच्या मार्फत केली जाणार आहे. हे नवे कोवीड सेंटर हरिद्वारमधील कोवीड रुग्णांसाठी अत्यंत सोयीचे ठरणार आहे.

Exit mobile version