कोविड काळातील दिशाभूल करणाऱ्या जाहिराती हटवण्याचे पतंजलीला निर्देश

दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय

कोविड काळातील दिशाभूल करणाऱ्या जाहिराती हटवण्याचे पतंजलीला निर्देश

दिल्ली उच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद कंपनीला दणका दिला असून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण आणि बाबा रामदेव यांना कोविड काळातील त्यांचे दावे मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी केलेल्या जाहिराती हटवण्याचेही आदेश दिले आहेत. कोविड काळात पतंजलीने ‘कोरोनिल’ हे आयुर्वेदिक औषध बनवले होते. या औषधाच्या जाहिराती करताना कोविडमुळे होत असलेल्या मृत्यूसाठी ऍलोपॅथी औषधांना जबाबदार धरणाऱ्या जाहिराती पंतजलीने केल्या होत्या. याविरोधात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधील निवासी डॉक्टरांची संघटना आणि इतर काही डॉक्टरांच्या संघटनेने याचिका दाखल केली होती.

या प्रकरणात न्यायमूर्ती अनुप जयराम भंभानी यांनी अंतरिम आदेश दिले आहेत. पतंजलीला तीन दिवसांत जाहिराती हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोविडमुळे होत असलेल्या मृत्यूंना ऍलोपॅथी जबाबदार असून ऍलोपॅथी डॉक्टरांमुळे हजारो लोकांचे मृत्यू होत आहेत, ऍलोपॅथी डॉक्टर चुकीचे औषधे देऊन नफा कमवत आहेत, अशा काही जाहिराती पतंजलीने केल्या होत्या, असे याचिकेत म्हटले आहे.

हे ही वाचा:

हिंदू तरुणाची धारावीत धारदार शस्त्राने हत्या, विश्व हिंदू परिषदेची पोलीस ठाण्यासमोर आंदोलन

पॅरिस ऑलिम्पिक : डिझायनर तहलीयानी म्हणाले, खेळाडूंची गणवेशनिर्मिती विचारपूर्वकच !

केजरीवालांविरोधात सीबीआयकडून आरोपपत्र

खारघरमध्ये गोळीबार करत दागिन्यांच्या दुकानात दरोडा; लाखोंचे दागिने लुटले !

न्यायमूर्ती अनुप जयराम भंभानी यांनी २१ मे रोजी पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निकाल राखून ठेवला होता. या खटल्यात असा आरोप करण्यात आला आहे की, रामदेव बाबा यांनी ‘कोरोनिल’ हा कोविड- १९ वरचा उपचार असल्याबद्दल दावा केला आहे. मात्र, या औषधाला केवळ इम्युनो-बूस्टर म्हणून परवाना देण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी चुकीची जाहिरात करून नागरिकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे रामदेव बाबा आणि इतरांना भविष्यात अशी विधाने करण्यापासून रोखण्याची विनंती डॉक्टरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वरिष्ठ वकिलांनी न्यायालयाला केली होती.

Exit mobile version