ऍशेस २०२३मध्ये पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लडवर दोन गडींनी मात करत पाच सामन्यांच्या मालिकेत १-०ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने कर्णधाराची खेळी करत इंग्लंडविरुद्धचा १८ वर्षांचा हिशेब चुकता केला. याच मैदानावर सन २००५मध्ये ऑस्ट्रेलियाला इंग्लंडच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांना अवघ्या दोन धावांनी पराभूत व्हावे लागले होते. यावेळीही ऑस्ट्रेलियाची अवस्था बिकट झाली होती, मात्र पॅट कमिन्सच्या ४४ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकता आला. ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी २८१ धावांचे लक्ष्य होते. फलंदाज उस्मान ख्वाजाने दुसऱ्या डावात ६७ धावा केल्या.
सन २००५मध्ये याच मैदानावर ऑस्ट्रेलियाला २८२ धावांचे लक्ष्य गाठायचे होते. अँड्र्यू फ्लिंटॉफच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाला अवघ्या दोन धावांनी पराभूत व्हावे लागले होते. फ्लिंटॉफने त्यावेळी चार गडी बाद केले होते. या सामन्यातही तळाच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी करून सामना जिंकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ते लक्ष्य गाठू शकले नव्हते. शेन वॉर्नने ४२ तर, ब्रेट लीने नाबाद ४३ धावांची खेळी केली होती.
हे ही वाचा:
संयुक्त राष्ट्रसंघाने ‘योग’च्या टीकाकारांना फटकारले
‘टायटॅनिक’चे अवशेष पाहण्यासाठी रिकामा करावा लागतो खिसा
मणिपूरमध्ये कुटुंबाच्या रक्षणासाठी गावकऱ्यांनी उचलले शस्त्र; बंकरमध्ये वास्तव्य
कोविड घोटाळा प्रकरणी संजय राऊत, आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर ईडीच्या धाडी
यंदा मात्र कर्णधार पॅट कमिन्सने त्याच मैदानावर १८ वर्षांपूर्वींचा हिशेब चुकता केला. या सामन्यात इंग्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करून आपला डाव ३९३ धावांवर घोषित केला होता. कदाचित हाच त्यांचा अवसानघातकी निर्णय ठरला. तेव्हा जो रूट शतक ठोकून खेळत होता आणि इंग्लंडच्या संघाच्या आठ विकेट शाबूत होत्या.
पहिल्याच दिवशी इंग्लंडने डाव घोषित केला नसता तर त्यांना त्यांची धावसंख्या वाढवण्याची संधी मिळाली असती. इंग्लंडच्या या धावसंख्येसमोर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात उस्मान ख्वाजाच्या शतकाच्या जोरावर ३८६ धावा केल्या. इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या डावात २७३ धावा केल्या आणि पाहुण्यांसमोर २८१ धावांचे लक्ष्य ठेवले. सद्यपरिस्थितीत हे लक्ष्य गाठणे सहजसोपे होते.