29 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषप्रवाशांना अत्यल्प दारात जेवण मिळणार

प्रवाशांना अत्यल्प दारात जेवण मिळणार

जनथाळी देण्याचा निर्णय

Google News Follow

Related

रेल्वेतून प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांना कमीत कमी किमतीमध्ये जेवण उपलब्ध व्हावे या हेतूने रेल्वेने ‘जनथाळी’ देण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून सामान्य प्रवाशांना प्रवासात कमी रकमेत जेवण मिळणार असल्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. मुंबईतील मुंबई सेंट्रल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकात ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ५० रुपयांमध्ये पाण्याच्या बाटलीसह ही थाळी मिळणार आहे.

रेल्वे फलाटावर लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या सामान्य डब्यांजवळ आयआरसीटीसीच्या माध्यमातून रेल्वे कर्मचाऱ्यांना स्टॉल उभारून थाळीची विक्री करण्याच्या सूचना रेल्वे मंडळाने सर्व क्षेत्रीय रेल्वेला दिल्या आहेत. ‘इकॉनॉमिकल’ आणि ‘अफोर्डेबल’ मिल अशा स्वरूपात ही जनथाळी असणार आहे. ‘इकॉनॉमिकल’ थाळीमध्ये २० रुपयांत ७ पुऱ्या, बटाट्याची भाजी आणि लोणचे असे पाकिट देण्यात येणार आहे. भात-राजमा/छोले भात, खिचडी, कुलचे/ भटूरे-छोले, पाव भाजी / मसाला डोसा असे पर्याय ५० रुपयांच्या ‘अफोर्डेबल’ मिलमध्ये असणार आहेत. त्याबरोबर २०० मिलीलीटरचे सीलबंद पिण्याचे पाणी देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त १५ रुपयांत एक लीटर रेलनीर हे बाटलीबंद पाणी सर्व रेल्वेस्थानकांत उपलब्ध असणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

नग्न धिंड प्रकरणातील मैतेई जमातीच्या आरोपीचे मैतेई महिलांनी जाळले घर

एनडीएच्या घटक पक्षांच्या खासदारांचे १० गट करून पंतप्रधान करणार चर्चा

इर्शाळवाडीमध्ये बचावकार्याला सुरुवात; ५० ते ६० जण अजूनही ढिगाऱ्याखाली

श्रीराम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम जवळपास पूर्ण एसटी बस अपघातांचे प्रमाण शून्यावर आणणार!

लोकमान्य टिळक टर्मिनससह मुंबई सेंट्रल, भुसावळ, पुणे, नागपूर, मनमाड, खांडवा या स्थानकात ही ‘जनथाळी’ उपलब्ध होणार आहे. आयआरसीटीच्या जनआहार केंद्रात तसेच उपाहारगृहात नाश्ता आणि जेवण बनवण्यात येणार आहेत. देशातील ६४ रेल्वे विभागांतील ६४ रेल्वे स्थानकांत ‘जनथाळी योजना’ प्रायोगिक तत्वावर सहा महिन्यांसाठी सुरू करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा