एअर इंडिया एक्सप्रेस विमानाच्या एका इंजिनमध्ये धूर निघून आग लागल्याची घटना घडली. हे विमान उड्डाणाच्या स्थितीत असताना ही घटना घडली. एअर इंडिया एक्सप्रेस बाेईग ७३७-८०० मस्कत- काेचिन विमानाच्या एका इंजिनातून धूर येत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तातडीने विमनातील क्रू सदस्य आणि १४५ प्रवाशांना आपात्कालीन स्लाईडवरूनबाहेर काढण्यात आले.
इंजिनमधून धूर येत असल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने विमानातून प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्याचं विमान वाहतूक महासंचालनालयानं म्हटलं आहे.या प्रवाशांना सुरक्षिततेचा उपाय म्हणून टर्मिनल बिल्डिंगमध्ये स्थलांतरीत करण्यात आले. सुदैवाने काेणालाही दुखापत झालेली नाही. सर्व जणांना स्लाइड्स वापरून बाहेर काढण्यात आले
हे ही वाचा:
अयोध्येतील राम मंदिरावर १८०० कोटी खर्च होणार
इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू
मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ जाहीर
पाकिस्तान विरुद्धच्या विजयाचा आनंद श्रीलंकेपेक्षा अफगाणिस्तानला जास्त
नागरी विमान वाहतूक महासंचालक अरुण कुमार यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, विमान वाहतूक नियामक या घटनेची चौकशी करून योग्य ती कारवाई करणार आहे. कोची येथील एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले की, स्लाइडवर फ्लाइटमधून उतरताना काही व्यक्तींना जखमा झाल्या आणि एका महिला प्रवाशाला दवाखान्यात नेण्यात आले.
स्मोक अलार्म वाजला नसल्याचं एअर इंडिया एक्सप्रेसच्या सूत्रांनी म्हटलं आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या उड्डाणाच्यावेळी विमानातील कर्मचाऱ्यांनी धूर पाहिला आणि त्यांनी त्याबाबत इशारा दिला. हे इंजिनमधील काही अवशेषांमुळे झाले असावे,” सूत्राने सांगितले. दरम्यान, प्रवक्त्याने सांगितले की, मुंबई-दुबई विमान लवकरच दुबईहून निघेल, मस्कत येथून प्रवाशांना घेऊन कोचीला नेले जाईल.