एअर इंडियातील क्रू मेंबरला मारहाण करणारा प्रवासी जेरबंद

लंडनला जाणारे विमान अर्ध्यातून दिल्लीला परतले

एअर इंडियातील क्रू मेंबरला मारहाण करणारा प्रवासी जेरबंद

एअर इंडियाच्या दिल्ली-लंडन विमानात प्रवाशाकडून क्रू मेंबरला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे हे विमान अर्ध्यातून पुन्हा दिल्ली विमानतळावर लँड करण्यात आले. याप्रकरणी एअर इंडियाने जसकिरत सिंग नामक प्रवाशाविरोधात दिल्ली एअरपोर्ट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या मारहाणीत दोन क्रू मेंबर्स जखमी झाले आहेत.

एअर इंडियानं या घटनेबाबत जाहीर केलेल्या निवदेनात नमूद केल्यानुसार, एअर इंडियाचं एआय- १११ विमान दिल्लीहून लंडनच्या हिथ्रो विमानतळाकडे निघालेल्या विमानाने सोमवारी १० एप्रिल रोजी सकाळी ६.३५ वाजता दिल्ली विमानतळावरुन उड्डाण केले. पण या विमानातील जसकिरत सिंग नामक प्रवाशाने विमानाच्या क्रू मेंबर्सना बेदम मारहाण केली, असा प्रकारचा गंभीर प्रकार घडल्याने विमानाच्या पायलटने विमान पुन्हा दिल्लीकडं वळवण्याचा निर्णय घेतला.

 

त्यानंतर विमान लँड झाल्यानंतर संबंधित प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. विमानात असलेल्या सर्वांची सुरक्षा आणि आत्मसन्मान जपणे हे आमच्यासाठी महत्वाचे आहे. ज्या क्रू मेंबर्सना मारहाण झाली त्यांना आम्ही सर्वतोपरी मदत करु. यानंतर प्रवाशांना मनस्ताप झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत दुपारी पुन्हा विमान लंडनसाठी शेड्यूल करण्यात आल्याचे एअर इंडियाने आपल्या निवदेनात नमूद केले आहे. दरम्यान विमानात गोंधळ घालणारा प्रवासी जसकिरत सिंग हा मनोरूग्ण असल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली.

हे ही वाचा:

आता गुजरातमध्ये उभी राहतेय भगवान द्वारकाधीशांची १०८ फूट उंचीची मूर्ती

शिवसेनाभवन, शिवसेनेचा निधी, शाखा एकनाथ शिंदेंना सोपवा!; सर्वोच्च न्यायालयात याचिका

स्वातंत्र्यवीरांना जुंपलेल्या कोलूतून अडीच किलो शेंगदाण्याचे तेल काढताना लागले दोन तास…

पावसापासून बचाव करण्यासाठी ते शेडखाली उभे होते, पण झाडाने जीव घेतला

एअर इंडियाच्या विमानात वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचं समोर आले आहे. एका प्रवाशाकडून महिलेच्या सीटवर लघवी केल्याच्या प्रकरणानंतर नुकतेच डीजीसीआयने एअर इंडियाला ३० लाखांचा दंड ठोठावला होता. तसेच त्यांच्या एका पायलट इन चार्जचे लायसन्सही तीन महिन्यांसाठी निलंबित केले होते. आपल्या कर्तव्याचे व्यवस्थित पालन न केल्याबद्दल डिरेक्टर इन फ्लाईट सर्व्हिसेसला देखील ३ लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता.

Exit mobile version