त्रिची विमानतळावर ४७ अजगर, २ सरडे घेऊन उतरला प्रवासी !

कस्टम अधिकाऱ्यांची कारवाई

त्रिची विमानतळावर ४७ अजगर, २ सरडे घेऊन उतरला प्रवासी !

क्वालालंपूरहून आलेल्या एका प्रवाशाच्या ट्रॉली बॅगमध्ये जिवंत सरपटणारे प्राणी आढळल्यानंतर त्रिची विमानतळावरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी ४७ अजगर आणि दोन सरडे जप्त केले. मोहम्मद मोईदीन असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

तामिळनाडूतील त्रिचीपल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका संशयित व्यक्तीला अटक करण्यात आली. व्यक्तीला अटक केल्यानंतर त्याची बॅग तपासण्यात आली. कस्टम अधिकाऱ्यांनी बॅग उघडताच सर्व चक्रावले.रविवारी क्वालालंपूरहून त्रिची विमानतळावर एक व्यक्ती उतरला. त्याच्याकडे ट्रॉली बॅग असल्याने कस्टम अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी ती उघडून पहिली तर त्या ट्रॉली बॅगमधून जिवंत स्वरूपात ४७ साप आणि दोन सरडे असल्याचे आढळले. क्वालालंपूरहून आलेल्या या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले आहे. मोहम्मद मोईदीन असे या गुन्हेगाराचे नाव आहे.

हे ही वाचा:

पंढरपूरात अधिकाऱ्याच्या मुलाने केली विठ्ठलाची पूजा, वारकरी आक्रमक!

‘फक्त शाकाहारी’ वरून बॉम्बे आयआयटीत गोंधळ !

मोदींना हुकूमशाह म्हणणारे उद्धव ठाकरे सोनिया गांधींपुढे लोटांगण घालतात !

पत्रकारिता क्षेत्रात तंत्रज्ञान वापराचा नवा टप्पा; AI अँकरने घेतली मंत्र्यांची मुलाखत

बाटिक एअरच्या विमानाने त्रिची विमानतळावर आल्यानंतर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी मोईदीनला रोखले. त्याच्या पिशव्यांबद्दल काहीतरी विचित्र लक्षात आल्याने, अधिका-यांनी अनेक छिद्रित बॉक्समध्ये लपवून ठेवलेले विविध जाती आणि आकारांचे जिवंत सरपटणारे प्राणी शोधण्यासाठी उघडले. वन अधिकाऱ्यांनी विमानतळावर पोहोचून ४७ अजगर आणि दोन सरडे जप्त केले. नियमानुसार सरपटणारे प्राणी मलेशियाला परत पाठवण्याची प्रक्रिया वनविभागाने सुरू केली आहे. मोईदीनला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Exit mobile version