पारुल चौधरी पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र

जागतिक चॅम्पियनशिपच्या ३००० मीटर अडथळा शर्यतीत राष्ट्रीय विक्रम

पारुल चौधरी पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र

बुडापेस्ट येथे रविवारी झालेल्या ३००० मीटर अडथळा शर्यतीच्या अंतिम फेरीत भारताच्या पारुल चौधरी हिने राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करून ११ वे स्थान पटकावले. त्यामुळे पारुल २०२४मध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. पारुलने ९:१५:३१ सेकंद वेळ नोंदवून ही शर्यत पूर्ण केली.

पारुल चौधरीने महिलांच्या जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ च्या अंतिम फेरीत पोहोचून आधीच इतिहास रचला होता. आता या स्पर्धेत तिने गाठलेली वेळ ऑलिम्पिक पात्रतेच्या निर्धारित वेळेपेक्षा १० सेकंद कमी होती. रविवारी पारुलने जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंसोबत अंतिम फेरीत भाग घेतला.

या स्पर्धेत पारुलला अनुभवी खेळाडूंकडून कठोर स्पर्धेचा सामना करावा लागला तरीही, पारुलने न डगमगता ९ मिनिटे आणि २४.२९ सेकंद अशी वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवत तिच्या फेरीत पाचवे स्थान मिळवण्यात यश मिळवले. या प्रभावी कामगिरीमुळे तिला केवळ अंतिम फेरीतच स्थान मिळाले नाही तर जागतिक ऍथलीटिक्स चॅम्पियनशिपमधील ट्रॅक इव्हेंटच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी ती दुसरी भारतीय महिला ऍथलीट बनली.

हे ही वाचा:

‘काँग्रेसकाळात अंतराळ संशोधनाला फारसे महत्त्व दिले जात नव्हते’

सांगलीमधील आश्रमशाळेतील १७० मुलांना विषबाधा

भारताच्या पुरुष ऍथलेटिक्स संघाने विक्रमी वेगाने अंतिम फेरीत मारली धडक

ऑनलाइन काम करणाऱ्यांना आम्ही लाइनवर आणले!

पारुलचा जन्म १५ एप्रिल १९९५ रोजी झाला. या यशापर्यंतचा तिचा प्रवास जिद्द आणि मेहनतीने घडला आहे. पारुलची ही कामगिरी तिच्या चिकाटी आणि खेळाप्रति समर्पणाचा पुरावा आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील मेरठजवळील इक्लौता गावातील एका शेतकऱ्याची मुलगी असणाऱ्या पारुलने खेळामध्ये स्वत:चे कौशल्य सिद्ध केले आहे. जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३मधील तिचे अलीकडील यश तिच्या कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे.

Exit mobile version