जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवार, १९ मे रोजी रात्रीच्या सुमारास अपघात झाल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. रामबन येथील मेकरकोट भागातील खूनी नाल्याजवळील बोगद्याच्या समोरचा एक भाग कोसळून हा अपघात झाला आहे. कोसळलेल्या भागाखाली आठ जण अडकल्याची भीती वर्तवण्यात येत असून तिघांना वाचवण्यात यश आले आहे.
खूनी नाल्याजवळ निर्माणाधीन चार लेन बोगद्याचा काही भाग काल रात्री कोसळला. या अपघातात आठ जण अडकल्याची शक्यता असल्याचे रामबनचे उपायुक्त म्हणाले. बोगद्याच्या तपासणीचे काम रात्री सुरू होते यावेळी हा अपघात घडला. अडकलेली माणसेही कंपनीची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बोगद्याच्या जवळच उभी असलेली वाहनं आणि मशिन्सचे नुकसान झाले आहे.
#WATCH | Rescue operation underway at Khooni Nala, Jammu–Srinagar National Highway in the Makerkote area of Ramban, where a part of an under-construction tunnel collapsed late last night; 6 to 7 feared trapped. pic.twitter.com/3LmZF0ctrm
— ANI (@ANI) May 20, 2022
हे ही वाचा:
निखत झरीनची जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत ‘सुवर्ण’ कामगिरी
आत्मनिर्भर 5G ची IIT मद्रासमध्ये यशस्वी चाचणी
आमच्याकडे तिसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्याचेही संख्याबळ आहे
काँग्रेसचे जोखड सोडल्यावर जाखड भाजपावासी
संबंधित अपघाताची माहिती प्रशासनाला मिळताच, तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. पोलीस आणि लष्कराकडून संयुक्त बचाव मोहीम सुरू आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान महामार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे.