25 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषपरशुराम घाट ३ एप्रिलपर्यंत बंद; सहा तास वाहतूक नाही

परशुराम घाट ३ एप्रिलपर्यंत बंद; सहा तास वाहतूक नाही

मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाट तेथील कामासाठी दुपारनंतर सहा तासांसाठी बंद राहणार आहे.

Google News Follow

Related

या सुमारे ५ किलोमीटर अंतराच्या घाटातील चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. संपूर्ण घाटाचे काम पावसाळ्यापूर्वी सुरू होऊन तो पूर्ण क्षमतेने आणि सुरक्षितपणे वाहतुकीस खुला व्हावा, यासाठी शासकीय यंत्रणेसह संबंधित ठेकेदार कंपनीने नियोजन केले आहे. घाटातील शेवटच्या टप्प्यातील अवघड ठिकाणचे चौपदरीकरण करण्यासाठी आजपासून म्हणजे  सोमवार, २७ मार्च ते ३ एप्रिलपर्यत दुपारी १२ ते सायंकाळी ६ पर्यंत घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, प्रादेशिक परिवहन विभागाला पाठवण्यात आलेल्या पत्रानुसार, राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून २१ मार्च रोजी घाटातील शेवटच्या टप्प्यामध्ये असलेल्या चौपदरीकरणाचे काम करण्यासाठी काही काळ वाहतूक बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार हा निर्णय झाला आहे.

हे ही वाचा:

बुडत्या सिलिकॉन व्हॅली बँकेला मिळाला फर्स्ट सिटीझनचा आधार

अबब!! पाकिस्तानात महागडा रमझान; ५०० रुपये डझन केळी, १६०० रु. किलो द्राक्षे

सुषमा स्वराज यांची कन्या बांसुरीची राजकारणात उडी

सावधान.. १३५ दिवसानंतर कोरोनाचे सक्रिय रुग्ण गेले १० हजारांच्यावर

सद्यःस्थितीत घाटातील कामाच्या प्रगतीचा अहवाल लक्षात घेता घाटाची लांबी ५.४० कि.मी. असून त्यापैकी ४.२० कि.मी. लांबीतील चौपदरीकरण आणि काँक्रिटचे काम पूर्ण झाले आहे. सध्या वाहतूक सुरळीत आहे. मात्र सुमारे १.२० कि.मी. लांबीचा रस्ता उंच डोंगररांगा व खोल दऱ्यांचा आहे. त्यामुळे तेथे काम करणे अवघड होत आहे. या लांबीमध्ये सुमारे २५ मीटर उंचीपर्यंत डोंगराचे खोदकाम आहे. हे काम चार टप्प्यांमध्ये सुरू आहे. पैकी तीन टप्प्यातील खोदकाम पूर्ण झाले आहे, तर चौथ्या टप्प्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

 

चौथ्या टप्प्यातील १०० मीटरमध्ये होणारे काम मोठ्या प्रमाणात अवघड स्वरूपाचे आहे. हे काम करताना घाटातील दगड-माती महामार्गावर येऊन अपघाताची शक्यता आहे. या सर्व बाबी लक्षात घेत शेवटच्या टप्प्यातील अवघड मार्ग असलेले हे काम पूर्ण करण्याकरिता आजपासून आठ दिवस दुपारनंतर महामार्ग वाहतुकीसाठी सहा तास बंद ठेवावे लागणार आहे.

या कालावधीत हलकी वाहने चिपळूण-आंबडस मार्गे वळविण्यात येणार आहेत. अवजड वाहनांच वाहतूक कोणत्या मार्गावरून केल जावी, याबाबत तत्काळ अहवाल मागविण्यात आला आहे, असे महामार्ग विभागातर्फे सांगण्यात आले. सलग सहा दिवस काम चालणार असल्याने महामार्गावरची वाहतूक बंद राहणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा