संसदेवर हल्ला करणाऱ्यांवर दहशतवादाचा आरोप,चारही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी!

पटियाला हाऊस कोर्टाने सुनावली कोठडी

संसदेवर हल्ला करणाऱ्यांवर दहशतवादाचा आरोप,चारही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी!

संसदेत घुसखोरी करून घोषणाबाजी करण्याऱ्या चारही आरोपींवर दहशतवादाचा आरोप ठेवण्यात आला आहे.आज कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर हे आरोप करण्यात आले. तसेच या चारही जणांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.पोलिसांनी १५ दिवसांची कोठडी मागितली होती.मात्र, पटियाला हाऊस कोर्टाने सात दिवसांची कोठडी मंजूर केली.गरज भासल्यास रिमांड वाढवता येईल, असेही सांगण्यात आले आहे.

संसदेची सुरक्षा भेदून दोन जण संसदेत शिरले होते. संसदेच्या बाहेरील आवारात दोघांनी घोषणाबाजी केली होती.लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीमधून उडी मारून दोन तरुणांनी नळकांड्या फोडल्या आणि घोषणा बाजी केली.अचानक झालेल्या प्रकारामुळे संसदेतील खासदार भयभीत झाले होते तर देशालाही धक्का बसला होता.

हे ही वाचा:

मराठा आंदोलक ऋषिकेश बेदरेला जामीन मंजूर!

संसदेत गोंधळ घातल्या प्रकरणी एक राज्यसभा आणि १४ लोकसभा खासदार निलंबित!

अस्मत अली बनली नेहा सिंग, इस्लाम धर्माचा त्याग करून स्वीकारला हिंदू धर्म!

कर्मचाऱ्यांची आर्थिक, सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे राखली जाईल

संसद भवनात घुसखोरी करणारे नीलम, अमोल, सागर शर्मा आणि मनोरंजन यांना अटक करण्यात आली होती. या चारपैकी दोघांवर संसदेच्या आत गोंधळ घालण्याचा आणि घोषणाबाजी करण्याता आरोप ठेवण्यात आला होता. या चौघांनाही पटियाला हाऊस कोर्टचे अॅडिशनल सेशन जज-२ डॉ. हरदीप कौर यांच्या कोर्टात हजर करण्यात आलं. दिल्ली पोलिसांकडून प्रोसिक्यूटर इरफान अहमद यांनी युक्तिवाद केला. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या चौघांची १५ दिवसांची रिमांड मागितली. पण कोर्टाने ७ दिवसांची रिमांड दिली आहे. गरज पडल्यास या चारही जणांची रिमांड वाढवण्यात येणार असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.

दिल्ली पोलिसांनी या चारही आरोपींविरोधात यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. म्हणजे या चारही जणांवर दहशतवादाचा आरोप ठेवला आहे. या प्रकरणात एकूण सहा आरोपी आहेत. मात्र, फक्त पोलिसांना चारच जणांना पकडता आलं आहे. एक आरोपी विशाल कोठडीत आहे. पण सहावा आरोपी ललित झा हा फरार आहे.तसेच संसदेत झालेल्या या घुसखोरी प्रकरणी आठ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.पोलिस याप्रकरणी अधीक तपास करत आहेत.

 

Exit mobile version