मुंबई मराठी पत्रकार संघाच्या द्वैवार्षिक निवडणुका २९ जून रोजी पार पडल्या. या निवडणुकात संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलने पूर्ण विजय मिळविला. १४ जागांसाठी ही निवडणूक झाली त्या सगळ्या जागा परिवर्तन पॅनलने जिंकल्या. समोर असलेल्या समर्थ पॅनलला एकही जागा निवडून आणता आली नाही.
अध्यक्षपदी संदीप चव्हाण यांनी ३१६ मते घेत मोठा विजय मिळविला. तर त्यांच्या इतर सहकाऱ्यांनीही यश खेचून आणले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या काल झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये संदीप चव्हाण यांच्या टीमने दणदणीत विजय मिळवत परिवर्तन पॅनलचा झेंडा फडकवला आहे. ज्येष्ठ पत्रकार संदीप चव्हाण यांची मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मोठ्या मताधिक्याने निवड झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई मराठी पत्रकार संघाची निवडणूक ही सातत्याने चर्चेचा विषय होती. यानिमित्ताने आरोप प्रत्यारोपही होत होते. निवडणुकीच्या दिवशी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेतही चांगली खडाजंगी झाली. त्यामुळे या निवडणुकीत परिवर्तन पॅनल आणि समर्थ पॅनल यांच्यात चांगली चुरस पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र परिवर्तनने एकहाती ही लढाई जिंकली.
हे ही वाचा:
टीम इंडियाच्या ‘ग्रेटेस्ट ऑफ द ऑल टाइम’ विराटबद्दल नेटिझन्सकडून कृतज्ञता
सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने एकनाथ शिंदेंनी लिहिली पोस्ट
काल्की २८९८ एडीची घसघशीत कमाई…’पौराणिक’ तडका लागलेल्या चित्रपटांना अच्छे दिन!
लडाखमध्ये रणगाडा सरावावेळी भारतीय सैन्याच्या पाच जवानांना हौतात्म्य !
ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर हे समर्थ पॅनल तर्फे पत्रकार संघाच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तथापि परिवर्तन पॅनलचे ज्येष्ठ पत्रकार संदीप चव्हाण यांनी तब्बल ३१६ मते खेचून घेत विजय मिळवला. खांडेकर यांना १६० मते मिळाली. ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक हे उपाध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात होते आणि त्यामुळे ते निवडून येतात का याकडे मंत्रालयासह संघातील अन्य माध्यम प्रतिनिधींचेही लक्ष होते. तथापि परिवर्तन पॅनलच्या ज्येष्ठ पत्रकार स्वाती घोसाळकर यांनी २८८ मते मिळवत बाजी मारली. उदय तानपाठक यांना २०८ मते मिळाली. तर राजेंद्र हुंजे यांना २२५ आणि विष्णू सोनवणे यांना २०३ अशी नेते मिळाली. राजेंद्र हुंजे उपाध्यक्ष पदासाठी निवडून आले. पत्रकार संघाच्या कार्यवाहपदी ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र शिर्के यांचा देखील मोठ्या मतांनी विजय झाला. कोषाध्यक्षपदी जगदीश भोवड यांचा २१० मतांनी विजय झाला. भोवड यांना ३३६ तर सारंग दर्शने यांना १२६ मते मिळाली.
परिवर्तन पॅनल कार्यकारणी सदस्य विजयी उमेदवार ( ९)
देवेंद्र भोगले २८२
दिवाकर शेजवलकर २८२
गजानन सावंत २७४
आत्माराम नाटेकर २७३
विनोद साळवी २७२
किरीट गोरे २४७
अंशुमान पोयरेकर २४६
राजेश खाडे २४५
राजीव कुलकर्णी २३४