पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताच्या खात्यात तिसऱ्या पदकाची भर पडली आहे. प्रीती पाल हिने १०० मीटर शर्यतीत कांस्यपदक पटकावले आहे. २३ वर्षीय प्रीतीने महिलांच्या १०० मीटर ‘टी-३५’ अंतिम फेरीत तिसरे स्थान पटकावले. यासह, पॅरालिम्पिक स्पर्धेत ‘ट्रॅक इव्हेंट’मध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली आहे.
याआधी आज नेमबाज अवनी लेखरा हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल SH१ फायनल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते, तर मोना अग्रवालने कांस्यपदक जिंकले होते. आता प्रीती पाल हिने देखील आपली कामगिरी दाखवत १०० मीटर ‘टी-३५’ अंतिम स्थान पटकावत कांस्यपदक आपल्या नावावर करून घेतले आहे.
प्रितीने महिलांच्या १०० मीटर (T३५) स्पर्धेत वैयक्तिक सर्वोत्तम वेळ १४.२१ सेकंदासह हे पदक जिंकले. चीनच्या झोउ जियाने सुवर्णपदक तर गुओ कियानकियानने रौप्यपदक जिंकले. झोऊने १३.५८ सेकंद वेळ नोंदवली. तर गुओने १३.७४ सेकंदांचा वेळ घेतला.
प्रीतीचे कांस्यपदक पॅरिस पॅरालिम्पिकमधील पॅरा ॲथलेटिक्समधील भारताचे पहिले पदक आहे. पॅरालिंपिक गेम्समध्ये टी ३५ श्रेणी अशा पॅरा ॲथलीट्ससाठी आहे, ज्यांना हायपरटोनिया, ॲटॅक्सिया आणि एथेटोसिस आणि सेरेब्रल पाल्सी इत्यादी यांसारखे समन्वय विकार आहेत.
हे ही वाचा :
पॅरालिम्पिकमध्ये नेमबाज मोनाची कांस्य पदकाची कमाई
आसाम विधानसभेत दोन तासांचा नमाज पठणाचा ब्रेक रद्द !
काँग्रेसवाल्यांना छत्रपतींची आठवण आली हेही नसे थोडके…
नेमबाज अवनी लेखराला पॅरालिम्पिकमध्ये दुसऱ्यांदा सुवर्ण!
दरम्यान, प्रीती पाल या वर्षाच्या सुरुवातीपासूनच जबरदस्त कामगिरी करत आहे. मार्च २०२४ मध्ये बेंगळुरू येथे झालेल्या ६व्या इंडियन ओपन पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिने २ सुवर्णपदके जिंकून वर्षाची सुरुवात चांगली केली. त्यानंतर मे महिन्यात जपानमध्ये झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत तिसरे स्थान मिळवून कांस्यपदक पटकावले. या पदकामुळे ती पॅरिस पॅरालिम्पिकचे तिकीट मिळवण्यात यशस्वी ठरली आणि आता तिने कांस्यपदक जिंकून नवा विक्रम केला आहे.
Athletics, #ParisParalympics: PREETI PAL IS ON THE PODIUM!!!
The Indian sprinter clocks a PB of 14.21s (wind: -0.1m/s) in the women's 100m (T35 category) to bring home a bronze medal!!!
Well done Preeti on a phenomenal performance on the biggest stage of them all..
👏🇮🇳🥉 pic.twitter.com/HC1NjxeVMz
— Vishank Razdan (@VishankRazdan) August 30, 2024