नेमबाज मनू भाकरने रचला इतिहास, कांस्य पदकावर कोरले नाव !

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली महिला नेमबाज

नेमबाज मनू भाकरने रचला इतिहास, कांस्य पदकावर कोरले नाव !

पॅरीस ऑलिम्पिकच्या स्पर्धेत भारताने खाते उघडेल आहे. भारतीय नेमबाज मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक-२०२४ मध्ये भारताला हे पहिलं कांस्यपदक मिळालं आहे. नेमबाज मनू भाकरने कांस्य पदकावर नाव कोरत इतिहास रचला आहे. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज ठरली आहे.

तब्बल १२ वर्षानंतर भारताने नेमबाजीमध्ये पदक मिळविले आहे. अभिनव बिंद्रा, राज्यवर्धन सिंग राठोड, विजय कुमार आणि गगन नारंग यांच्यानंतर नेमबाजीत ऑलिम्पिक पदक जिंकणारी मनू ही पाचवी नेमबाज ठरली. मनू भाकरने मोठ्या आत्मविश्वासाने फायनलला सुरुवात केली. शूटिंग रेंजवर जेव्हा तिचे नाव पुकारले गेले, तेव्हा मनूने टीव्ही कॅमेऱ्यांसमोर एक स्मितहास्य दाखवले, ज्यामुळे भारतीय प्रेक्षकांना खूप आनंद झाला.

हे ही वाचा:

रमिता जिंदालने रचला इतिहास, १० मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत प्रवेश !

उरणमध्ये लव्ह जिहादमुळे उद्रेक, तरुणीची हत्या करून फेकून दिला मृतदेह, दाऊद शेखचा शोध सुरू

दिल्लीत कोचिंग सेंटरच्या तळघरात साचलेल्या पाण्यात तीन विद्यार्थी बुडाले !

ऑलिम्पिक २०२४; पहिल्या सामन्यात पीव्ही सिंधूचा दणदणीत विजय !

५ शॉट्सच्या पहिल्या मालिकेत ५०.४ शूट करत मनूने जोरदार सुरुवात केली. मनूने पहिल्या मालिकेत तीन वेळा १० पेक्षा जास्त शूट केले. ५ शॉट्सच्या दुसऱ्या सेटमध्ये, मनूने तिची संख्या १००.३ वर नेली आणि संपूर्ण स्पर्धेत टॉप ३ मध्ये राहण्यात यशस्वी ठरली. कांस्य पदक जिंकल्यावर मनू भाकरने प्रतिक्रिया दिली. ‘कृष्णाने अर्जुनाला केवळ लक्ष्यावर ध्यान देण्यास सांगितलं होतं, तेच फायनलमध्ये माझ्या डोक्यात सुरू होतं, असे मनू भाकरने म्हटले.

Exit mobile version