29 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरविशेषपॅरिस ऑलिम्पिक समारोप समारंभात मनू भाकर भारतीय संघाची होणार ध्वजवाहक !

पॅरिस ऑलिम्पिक समारोप समारंभात मनू भाकर भारतीय संघाची होणार ध्वजवाहक !

आयओएस सूत्रांची माहिती

Google News Follow

Related

भारताची स्टार नेमबाज मनू भाकर पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभात भारतीय संघाची ध्वजवाहक बनण्याची शक्यता आहे. मनू भाकरने आपल्या शानदार कामगिरीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तिने दोन कांस्यपदके जिंकली. दरम्यान, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (आयओएस ) च्या सूत्रांच्या हवाल्याने वृत्तसंस्था एएनआयने सांगितले की, मनू भाकर पॅरिस ऑलिम्पिक समारोप समारंभात भारतीय संघाची ध्वजवाहक बनू शकते. मात्र, अद्याप यासंदर्भात औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.

या समारंभासाठी भारताच्या पुरुष ध्वजवाहकाचे अद्याप नाव समोर आलेले नाही. ११ ऑगस्ट रोजी समारोप समारंभ पार पडणार आहे. ऑलिम्पिकच्या उदघाटन समारंभात भारतीय संघाचे नेतृत्व स्टार शटलर पीव्ही सिंधू आणि टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल यांनी केले होते.

हे ही वाचा:

सेल्फीचा मोह आवरेना; साताऱ्याच्या बोरणे घाटात २५० फूट दरीत तरुणी कोसळली पण…

महायुती सरकारचा बळीराजाला दिलासा; पिकांच्या नुकसानीपोटी ५९६ कोटींची मदत जाहीर

युपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या अकोल्यातील विद्यार्थिनीची दिल्लीत आत्महत्या

अतिरेकी संघटना हिजबुल्लाचा इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला

दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने ऐतिहासिक कागगिरीची नोंद केली आहे. तिने प्रथम १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्य पदक पटकावले. यानंतर १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सरबज्योत सिंग यांच्यासोबत दुसरे कांस्य पदक पटकावले. विशेष म्हणजे एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळविणारी मनू भाकर देशातील पहिली खेळाडू ठरली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
218,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा