पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय नेमबाज मनू भाकरने १० मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक पटकावत इतिहास रचला. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज ठरली. यासह भारतीय नेमबाज रमिता जिंदालने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरी गाठली. रमिता जिंदालच्या पाठोपाठ भारतीय नेमबाज अर्जुन बबुताने आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवत पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे नेमबाजी स्पर्धेत भारताला अधिक पदके मिळण्याची आशा आहे.
१० मीटर एअर रायफल पुरुषांच्या पात्रता स्पर्धेत नेमबाज अर्जुन ७ व्या स्थानावर राहून अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. अर्जुनला एकूण ६३०.१ गुण मिळाले. तर दुसरा भारतीय नेमबाज संदीप सिंग ६२९.३ गन मिळवत १२व्या स्थानावर राहिला आणि त्यामुळे तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही.
हे ही वाचा:
भारताला नमवून श्रीलंकन महिलांनी मिळविला आशिया चषक
मनू भाकर म्हणते, श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या मार्गावर चालले!
…तर जगात मनुष्यबळ पुरवण्यात भारत विश्वगुरू बनेल!
पॅरिस ऑलिम्पिकची जगभरात चर्चा, भारतीय खेळाडूंचे मनोबल वाढले !
दरम्यान, भारतीय नेमबाज रमिता जिंदालने क्वालिफिकेशन राऊंडमध्ये ६३१.५ गुण मिळवून अंतिम सामन्यात प्रवेश केला. रमिता जिंदालने सहाही फेरीत १०० पेक्षा जास्त गुण मिळवले. या स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारी ती तिसरी भारतीय महिला खेळाडू ठरली. दरम्यान, रमिता जिंदाल उद्या (२९ जुलै) अंतिम सामना खेळणार असून सुवर्णपदक मिळविण्याचा प्रयत्न करेल.