अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांचा साखरपुडा अखेर शनिवारी नवी दिल्लीत एका खासगी समारंभात पार पडला. यावेळी कुटुंबातील सदस्य, राजकीय नेते यांच्यासह अवघे १५० पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. राघव आणि परिणिती या दोघांनीही त्यांच्या साखरपुड्याची छायाचित्रे इन्स्टाग्रामवर शेअर केली. त्यानंतर चाहत्यांनी दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव केला.
या सोहळ्याला राघव यांनी त्यांचे काका डिझायनर पवन सचदेवा यांनी डिझाइन केलेले अचकन परिधान केले होते. तर, ३४ वर्षीय परिणितीने डिझायनर मनीष मल्होत्रा याचा पेस्टल पीच ड्रेस परिधान केला होता. परिणितीची चुलतबहीण आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनस हीदेखील या समारंभाला आवर्जून उपस्थित होती. पिवळ्या रंगाच्या साडीत तिचे सौंदर्य खुलून आले होते. सोहळ्यानंतर तिने भाऊ सिद्धार्थ चोप्रा आणि परिणितीचे वडील पवन चोप्रा यांच्यासोबत छायाचित्रे काढली.
या समारंभाला ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम, शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि तृणमूल काँग्रेसचे नेत डेरेक ओब्रायन यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल उपस्थित होते. या सोहळ्याला शनिवारी संध्याकाळी पाच वाजता सुरुवात झाली. शीख परंपरेनुसार सर्व धार्मिक कार्ये पार पाडली.
हे ही वाचा:
भाजपच्या उमेदवाराने काँग्रेसच्या प्रतिस्पर्ध्यावर मिळविला अवघ्या १६ मतांनी विजय
मोदींचा करिष्मा सोबत आहेच पण स्थानिक नेतृत्वाचे काय?
उत्तरप्रदेशात सगळे महापौर भाजपाचे तर ९९ नगराध्यक्ष
बृजभूषण सिंह यांचे कुस्ती महासंघ अध्यक्षपद गेले!
मार्च महिन्यापासूनच परिणिती आणि राघव यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली होती. मार्चमध्ये त्यांना मुंबईत एकत्र पाहण्यात आले होते. त्यानंतर वरचेवर त्यांच्या भेटीगाठी होत होत्या. अखेर शनिवारी त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाले. साखरपुड्याच्या दिवशी परिणितीचे मुंबईतील आणि राघव यांच्या दिल्लीतील सरकारी घराला दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती.