१ एप्रिलला पंतप्रधान मोदी ‘परीक्षा पे चर्चा’ करणार

१ एप्रिलला पंतप्रधान मोदी ‘परीक्षा पे चर्चा’ करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी भारतीयांशी विविध माध्यमातून थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असेच एक चर्चासत्र होणार आहे. ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम शुक्रवार, १ एप्रिल रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडीओ शेअर करत या संदर्भात माहिती दिली आहे.

‘परीक्षा पे चर्चा’ हे चर्चासत्र गेल्या वर्षी ऑनलाईन पद्धतीने झाला होता. त्यानंतर मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ डिसेंबरच्या ‘मन की बात’ मधून देशाला संबोधित करताना २०२२ मध्ये विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा या अंतर्गत संवाद साधणार असल्याचे जाहीर केले होते.

नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. चला परीक्षांचा महोत्सव साजरा करुया. तणावरहित परीक्षांची चर्चा करुयात. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम १ एप्रिलला पाहा, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले आहे.

‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम ऑफलाईन पद्धतीने दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना या कार्यक्रमासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. २८ डिसेंबरपासून ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाची नोंदणी सुरु झाली होती. ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात ९ वी ते १२ मध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.

हे ही वाचा:

पोस्ट टाकली म्हणून शिवसैनिकांनी मारले

त्या ‘मातोश्रीं’ना कोटी कोटी प्रणाम!

‘मातोश्री’ चरणी यशवंत जाधवांचे २ कोटी आणि ५० लाखांचे घड्याळ

किरीट सोमय्या, निलेश राणे रत्नागिरी जिल्ह्यातून हद्दपार

१६ फेब्रुवारी २०१८ ला ‘परीक्षा पे चर्चा’मधील पहिला कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोर्ड परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांवर मानसिक तणाव येऊ नये म्हणून मोदी त्यांना काही सल्ले देत असतात. गेल्या वर्षीपासून विद्यार्थ्यांसह त्यांचे आई वडील, शिक्षक यांना देखील कार्यक्रमात सहभागी करुन घेण्यात आले आहे.

Exit mobile version