देशामध्ये सद्यस्थितीला कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याकारणाने आता शाळा लवकरात लवकर सुरु कराव्यात असा पवित्रा आता पालकांनीच घेतलेला आहे.
शाळा सुरु व्हायला हव्या का याबाबत एक सर्वेक्षण लोकल सर्कल्सने केले होते. याअंतर्गत आता पालकच मुलांना शाळेत पाठविण्यासाठी तयार झालेले आहेत. या सर्वेक्षणामध्ये तब्बल ७४ टक्के पालकांनी होकार नोंदवलेला आहे. जूनमध्ये तब्बल ७६ टक्के पालकांनी आपल्या पाल्यास शाळेत पाठविण्यासाठी नापसंती दर्शवली होती. परंतु आता मात्र कोरोनाचा प्रभाव कमी होत असताना चित्र आश्वासकरीत्या बदलले आहे.
८९ टक्के पालक आता स्थानिय पातळीवर लसीकरणासाठी आग्रही आहेत. शाळेच्या जवळ लसीकरण केंद्र असायला हवे असे आता पालकांचे म्हणणे आहे. शाळेतील शिक्षकांचे लसीकरण होणं हे गरजेचं आहे असे आता तज्ज्ञांचेही म्हणणे आहे. मुख्य म्हणजे कोरोना कार्यकाळात शाळा बंद असल्यामुळे मुलांचे शैक्षणिक खूपच नुकसान झालेले आहे. यामुळेच आता पालक मुलांसाठी योग्य ती काळजी घेण्यात यायला हवी याकरता आग्रही झाले आहेत.
हे ही वाचा:
लसीचा एक डोस घेतलात तरी तुम्ही सुरक्षित
आता या माध्यमातून अमेरिकेची तालिबानवर कारवाई?
बालभारती पुस्तक छाप….बालभारती रद्दी काढ
ते दुःख विसरून अमितने घेतला सुवर्णपदकाचा वेध
कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यातील शाळा तब्बल दीड वर्ष बंद आहेत. त्यातच भरीस भर आनलाइन शिक्षणामुळे मुलांच्या आरोग्याच्या तक्रारीसुद्धा वाढू लागलेल्या आहेत. त्यामुळेच आता योग्य ती काळजी घेऊन पालक आता मुलांच्या शाळा उघडाव्यात अशी मागणी करत आहेत. केवळ १६ टक्के पालक कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे मुलं शाळेत पाठवण्यास अद्यापही तयार नाहीत. राज्यातील पालक मोठ्या प्रमाणात शाळा सुरू केल्या जाव्यात, अशा मानसिकतेत असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.