22 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषपोरांच्या शाळा सुरू करा हो आता!

पोरांच्या शाळा सुरू करा हो आता!

Google News Follow

Related

महाराष्ट्रात कोरोना निर्बंध लागू असले तरी आता शाळा सुरू होण्याकरता पालकांनीच पुढाकार घेतलेला आहे. ठाकरे  राज्यातील शाळा सुरु व्हायला हव्या का याबाबत एक सर्वेक्षण करण्यात आले होते. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने हे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणामध्ये तब्बल ८५ टक्के पालकांनी होकार नोंदवलेला आहे.

एससीईआरटीने केलेल्या सर्वेक्षणात आतापर्यंत एकूण २,२५,१९४ पालकांनी आपले मत नोंदविले आहे. ग्रामीण भागातून १ लाख १८ हजार १८२ म्हणजेच ५२.४८ टक्के पालकांनी मत नोंदवले आहे. शहरी भागातून ८३ हजार ०६४ म्हणजेच ३६.८९ टक्के पालक आहेत. मुलांना यात शाळेत पाठवायला तयार असणारे १ लाख ८९ हजार ०९५ म्हणजेच जवळपास ८३.९७ टक्के आहेत.

कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यातील शाळा तब्बल दीड वर्ष बंद आहेत. त्यातच भरीस भर आनलाइन शिक्षणामुळे मुलांच्या आरोग्याच्या तक्रारीसुद्धा वाढू लागलेल्या आहेत. त्यामुळेच आता योग्य ती काळजी घेऊन पालक आता मुलांच्या शाळा उघडाव्यात अशी मागणी करत आहेत. केवळ १६ टक्के पालक कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे मुलं शाळेत पाठवण्यास अद्यापही तयार नाहीत.

हे ही वाचा:
लाल माकडं आणि नव लिबरल डोंबारी

दहशतवाद्यांना मदत कराल तर याद राखा!

नाना पटोलेंसारख्या ‘लहान माणसा’ला शरद पवारांचा टोला

अफगाणिस्तानमध्ये धोका; भारतीय अधिकाऱ्यांना आणले माघारी

राज्यात पालक मोठ्या प्रमाणात शाळा सुरू केल्या जाव्यात, अशा मानसिकतेत असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. २०२१-२२ मध्ये राज्यातील कोरोनामुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यात आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरु करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आता इतर इयत्तांच्या शाळा कधी सुरू होणार असा प्रश्नही विचारला जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा