संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना!

परभणीत आंदोलनाला हिंसक वळण

संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना!

परभणीत आंबेडकर अनुयायांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. दगडफेक, जाळपोळ झाल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार, अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या. दरम्यान, सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

काल (१० डिसेंबर) एका माथेफिरूकडून संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती. यानंतर उपस्थितांनी त्या व्यक्तीला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले. काही वेळानंतर आंबेडकरी आनुयायांकडून आंबडेकर पुतळा परिसरात जोरदार निदर्शेन करण्यात आली. आंदोलकांनी काल मुंबईला येणारी नंदीग्राम एक्सप्रेस अर्धा तास रोखून धरली होती.

या प्रकरणावरून अनुयायांकडून आज परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, आंदोलक आक्रमक झाल्यानंतर बंदला हिंसक वळण लागले. काही ठिकाणी दगडफेक, दुकानांची जाळपोळ केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, तेथील परिस्थिती नियंत्रणात आल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा : 

बांगलादेश सरकारने केले कबूल, म्हणाले हिंदूंविरुद्ध हिंसाचाराच्या ८८ घटना घडल्या!

बांगलादेशमधील हिंदुंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रस्त्यावर

वेलकम फेम मुश्ताक खान यांचेही केले होते अपहरण!

“अध्यक्षांचा आदर करू शकत नसाल तर सभागृहाचे सदस्य राहण्याचा अधिकार नाही”

 

Exit mobile version