पॅरालिम्पिक: थाळीफेक ॲथलीट योगेश कथुनियाने रौप्यपदक जिंकले !

भारताच्या झोळीत आठ पदके

पॅरालिम्पिक: थाळीफेक ॲथलीट योगेश कथुनियाने रौप्यपदक जिंकले !

पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या योगेश कथुनियाने पुरुषांच्या थाळीफेक एफ५६ स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे. योगेश कथुनियाने यापूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्येही या स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. योगेशने येथे ४२.२२ मीटरच्या हंगामातील सर्वोत्तम थाळीफेकसह आपल्या यशाची पुनरावृत्ती केली.

थाळीफेक प्रकारात एकूण सहा थ्रो असतात, यातील उत्तम थ्रोची नोंद केली जाते. मात्र, २९ वर्षीय योगेशने पहिल्याच प्रयत्नात ४२.२२ मीटर अंतर कापून चालू हंगामातील सर्वोत्तम कामगिरी केली. ब्राझीलच्या क्लाउडनी बतिस्ता डॉस सँटोसने पाचव्या प्रयत्नात ४६.८६ मीटर अंतर पार करून पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक पूर्ण केली. तर ग्रीसच्या कोन्स्टँटिनोस त्झोनिसने ४१.३२ मीटरच्या प्रयत्नाने कांस्यपदक जिंकले. दरम्यान, एफ५६ श्रेणीमध्ये स्पर्धा करणारे खेळाडू बसलेल्या स्थितीत स्पर्धा करतात. या प्रकारात असे खेळाडू आहेत, ज्यांच्या पाठीचा कणा खराब झाला आहे आणि शरीराच्या खालच्या भागात विकार आहे.

योगेश कथुनियाने रौप्यपदक पदक जिंकत भारताची पदकांची संख्या आठवर गेली आहे. आता या पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात एक सुवर्ण पदक, तीन रौप्य पदके आणि चार कांस्य पदके आहेत.

हे ही वाचा : 

चित्रपट उद्योगाप्रमाणेच केरळ काँग्रेसमध्ये केले जाते महिलांचे शोषण!

मराठवाड्यात पूर, ५०-६० गावांचा नांदेडशी संपर्क तुटला !

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची पसंती एसटीला

कन्नौज बलात्कार प्रकरण: सपा नेता नवाब सिंह यादवचा डीएनए सॅम्पल झाला मॅच!

होय मोदींनी सत्यानाश केला, पण लफंग्यांचा! Mahesh Vichare | Narendra Modi |Uddhav Thackeray |

Exit mobile version