दिव्यांग खेळाडूंनी केला भीमपराक्रम; पॅरालिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके !

भारताच्या खात्यात २९ पदके

दिव्यांग खेळाडूंनी केला भीमपराक्रम; पॅरालिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके !

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ भारतासाठी उत्कृष्ट ठरला. भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी दाखवत पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम केला. भारताने एकूण २९ पदके जिंकली, ज्यात ७ सुवर्ण, ९  रौप्य आणि १३ कांस्य पदकांचा समावेश आहे. याआधी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने सर्वाधिक १९ पदके जिंकण्याचा विक्रम केला होता, तो पॅरिसमधील पॅरा भारतीय खेळाडूंनी मोडून काढला. दरम्यान,  पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ चा आजचा शेवटचा दिवस होता.

पदकतालिकेत भारत १८ व्या क्रमांकावर आहे. भारताने पदकतालिकेत स्वित्झर्लंड, दक्षिण कोरिया, बेल्जियम आणि अर्जेंटिना या देशांना मागे टाकले आहे. तसे पाहिले तर भारताची पॅरालिम्पिकमध्ये आतापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. पॅरालिम्पिकच्या मागील दोन आवृत्त्यांमध्ये भारताने एकूण ४८ पदके जिंकली आहेत. तर मागील ११ आवृत्त्यांमध्ये भारताने केवळ १२ पदके जिंकली होती. गेल्या दोन आवृत्त्यांमधून खूप सुधारणा आणि बदल झाल्याचे स्पष्टपणे यंदाच्या पॅरालिम्पिकमध्ये दिसून येते.

यंदाच्या पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये एकूण ८४ खेळाडूंनी भाग घेतला, आणि सर्वाधिक पदके जिंकून इतिहास रचला. टोकियो पॅरालिम्पिकपूर्वी भारताने केवळ ४ सुवर्णपदके जिंकली होती, तर टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये भारताच्या खात्यात ५ सुवर्ण पदके होती. आता फक्त पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताने ७ सुवर्ण जिंकले आहेत.

हे ही वाचा : 

मणिपूरमध्ये कोम्बिंग ऑपरेशन, दारुगोळ्याचा मोठा साठा जप्त !

बांगलादेशी घुसखोर बेंगळुरूत घुसणार होते; पण त्रिपुरातच अटक !

महावीर फोगाट म्हणतात, विनेशने भाजपात प्रवेश करायला हवा होता!

इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांचा नरेंद्र मोदींवर विश्वास!

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताची सर्व २९ पदके

१ . अवनी लेखरा (नेमबाजी) – सुवर्णपदक, महिला १० मीटर एअर रायफल (SH१)

२ . मोना अग्रवाल (नेमबाजी) – कांस्य पदक, महिला १० मीटर एअर रायफल (SH१)

३ . प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिलांची १०० मीटर शर्यत (T३५)

४. मनीष नरवाल (नेमबाजी) – रौप्य पदक, पुरुष १० मीटर एअर पिस्तूल (SH१)

५. रुबिना फ्रान्सिस (शूटिंग) – कांस्य पदक, महिला १० मीटर एअर पिस्तूल (SH१)

६. प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिलांची २०० मीटर शर्यत (T३५)

७. निषाद कुमार (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष उंच उडी (T४७)

८. योगेश कथुनिया (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष डिस्कस थ्रो (F५६)

९. नितीश कुमार (बॅडमिंटन) – सुवर्णपदक, पुरुष एकेरी (SL३)

१०. मनीषा रामदास (बॅडमिंटन) – कांस्य पदक, महिला एकेरी (SU५)

११. तुलसीमाथी मुरुगेसन (बॅडमिंटन) – रौप्य पदक, महिला एकेरी (SU५)

१२. सुहास एल यथीराज (बॅडमिंटन) – रौप्य पदक,पुरुष एकेरी (SL४)

१३. शीतल देवी-राकेश कुमार (तिरंदाजी) – कांस्य पदक, मिश्र कंपाउंड ओपन

१४. सुमित अँटील (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुष भालाफेक (F६४ श्रेणी)

१५. नित्या श्री सिवन (बॅडमिंटन) – कांस्य पदक, महिला एकेरी (SH६)

१६. दीप्ती जीवनजी (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिला ४०० मीटर (T२०)

१७. मरियप्पन थांगावेलू (ॲथलेटिक्स) – कांस्य पदक, पुरुष उंच उडी (T६३)

१८. शरद कुमार (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष उंच उडी (T६३)

१९. अजित सिंग (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष भालाफेक (F४६)

२०. सुंदरसिंग गुर्जर (ॲथलेटिक्स) – कांस्य पदक, पुरुष भालाफेक (F४६)

२१. सचिन सरजेराव खिलारी (एथलेटिक्स) -सिल्वर मेडल, मेन्स शॉट पुट (F४६)

२२. हरविंदर सिंग (तिरंदाजी) – सुवर्ण पदक, पुरुष वैयक्तिक रिकर्व्ह ओपन

२३. धरमबीर (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुषांचा क्लब थ्रो (F५१)

२४. प्रणव सुरमा (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष क्लब थ्रो (F५१)

२५. कपिल परमार (जुडो) – कांस्य पदक, पुरुष ६० किलो (जे१)

२६. प्रवीण कुमार (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुष उंच उडी (T४४)

२७. होकुटो होतोजे सेमा (ॲथलेटिक्स) – कांस्य पदक, पुरुषांचा शॉट पुट (F५७)

२८. सिमरन शर्मा (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिला २०० मीटर (T१२)

२९. नवदीप सिंग (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुष भालाफेक (F४१)

Exit mobile version