भारतीय ॲथलीट कपिल परमारने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये ज्युदोमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. कपिलने ब्राझीलच्या खेळाडूला अवघ्या ३३ सेकंदात पराभूत करून कांस्यपदकावर नाव कोरले. पॅरालिम्पिकच्या इतिहासात ज्युदोमध्ये पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. कपिलने ब्राझीलच्या एलिओल्टन डी ऑलिव्हिएराला १०-० असे पराभूत करून हे यश मिळवले. या विजयासह भारताने आपले २५ वे पदक जिंकले आहे.
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ च्या सुरवातीपासूनच भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी दाखविली. कपिलच्या विजयाने भारताच्या खात्यात २५ पदकांची कमाई झाली असून यामध्ये अधिक भर होईल अशी सर्वांना आशा आहे. भारताने आतापर्यंत ५ सुवर्ण ९ रौप्य आणि ११ कांस्यपदक जिंकेल आहेत.
कपिलने व्हेनेझुएलाच्या मार्कोस ब्लँकोचा १०-० असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. कपिलला फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा होत्या पण त्याला इराणच्या खेळाडूविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. उपांत्य फेरीत इराणच्या जुडोका बनिताबा खोर्रमने कपिलचा १०-० असा पराभव केला. अशा परिस्थितीत पदकासाठी कपिलचा शेवटचा पर्याय होता कांस्यपदकाचा सामना आणि यावेळी त्याने मिळालेल्या संधीचे सोने करत अवघ्या ३३ सेकंदात पदक जिंकले. ब्राझीलच्या एलिओल्टन डी ऑलिव्हिएराला १०-० असे पराभूत करून हे यश मिळवले.
हे ही वाचा :
लोअर परळच्या कमला मिल परिसरात पुन्हा आगीचे लोट !
‘लाडकी बहीण’ योजनेवरून खोटा आरोप करणाऱ्या आव्हाडांविरोधात गुन्हा
५२.४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात!
आरजी कर रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी
दरम्यान, भारत पदकतालिकेत १४ व्या स्थानावर पोहोचला आहे. पॅरालिम्पिक खेळ ८ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहेत आणि भारतीय खेळाडू अजूनही इतर अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत, ज्यामुळे २५ चा आकडा वाढण्याची खात्री आहे.