बॅडमिंटनमध्ये भारताचा जलवा, नितेश कुमारने मारलं गोल्ड !

भारताला दुसरे सुवर्णपदक, खात्यात ९ पदके

बॅडमिंटनमध्ये भारताचा जलवा, नितेश कुमारने मारलं गोल्ड !

पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू एकामागून एक चांगली कामगिरी करत भारताच्या खात्यात पदकांची भर करत आहे. थाळीफेक ॲथलीट योगेश कथुनियानंतर काही वेळातच भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडली आहे. योगेशने थाळीफेकमध्ये रौप्यपदक पटकावले होते, त्यानंतर आता नितीश कुमारने बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. पॅरालिम्पिकमधील भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. भारताच्या खात्यात एकूण ९ पदके जमा झाली आहेत.

नितीश कुमारने पुरुष एकेरी बॅडमिंटन एसएलच्या अंतिम फेरीत चांगली कामगिरी केली. त्याची स्पर्धा ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलशी होती. पदकांच्या लढतीत दोघांमध्ये रोमांचक लढत झाली, पण शेवटी नितीशकुमारने सुवर्णपदक जिंकले. नितीशकुमारने पहिल्या सेटपासूनच प्रतिस्पर्धी खेळाडूवर वर्चस्व राखले. त्याने पहिला सेट २१-१४ असा जिंकला. मात्र दुसऱ्या सेटमधील पराभवाने त्याचे टेन्शन वाढले होते.

हे ही वाचा : 

शाळकरी मुलींची छेडछाड करणाऱ्या नराधम अय्याज काझीचे खोके उध्वस्त

मुस्लिम युवकाने कुराणची प्रत जाळत सनातनचा केला स्वीकार!

माता वैष्णो देवी यात्रेच्या मार्गावर दरड कोसळून अपघात; दोन महिला यात्रेकरूंचा मृत्यू

पॅरालिम्पिक: थाळीफेक ॲथलीट योगेश कथुनियाने रौप्यपदक जिंकले !

दुसरा सेट गमावल्यानंतर त्याने पुनरागमन केले. तिसऱ्या सेटमध्ये त्याने रोमहर्षक लढतीत डॅनियल बेथेलचा २३-२१ असा पराभव केला आणि सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. बॅडमिंटनपटू नितीश कुमारच्या सुवर्ण पदकाने भारताच्या खात्यात ९ पदके जमा झाली आहेत.

Exit mobile version