दुसऱ्या दिवशी पंतने भारताला तारले

दुसऱ्या दिवशी पंतने भारताला तारले

भारत-इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना चुरशीचा होत चालला आहे. आजच्या दिवसाअखेर भरताचा स्कोर २९४-७ असा राहिला. भारताच्या बहुतांश फलंदाजांनी या सामन्यातही निराशाजनक कामिगिर केली आहे.

दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यावर भारताची फलंदाजी पहिला एक तास तग धरून होती. मात्र जॅक लीचने पुजाराला बाद केल्यानंतर कोहली आणि रहाणे लवकर बाद झाले. पहिल्या सत्राच्या अखेरीस भारताचा स्कोर ८०-४ असा झाला होता. दुसऱ्या सत्रात रोहित शर्मा आणि रिषभ पंत यांनी मिळून भारताचा डाव सावरला. दुसऱ्या सत्रात रहित शर्मा ४९ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ अश्विनही बाद झाला. पण दुसऱ्या बाजूने रिषभ पंत टिकून होता. त्यामुळे दुसऱ्या सत्राच्या अखेरीस भारताचा स्कोर हा १५१-६ असा होता.

हे ही वाचा:

‘चौथ्या सामन्यातही इंग्लंडचा गरबा’

तिसऱ्या सत्रात रिषभ पंतने इंग्लंच्या गोलंदाजांची चौफेर धुलाई सुरु केली. टेस्ट क्रिकेटमध्ये सहाशेपेक्षा जास्त विकेट घेतलेल्या अँडरसनलादेखील पंतने दोन पावले पुढे येऊन गोलंदाजाच्या मागे चौकार लगावला. दुसऱ्या टोकावर असलेल्या वॉशिंग्टन सुंदर यानेही पंतला चांगली साथ दिली. पंतने अर्धशतक झळकावल्या नंतर पुढच्या ५० धावा ३३ बॉलमध्ये केल्या. शतक झळकावल्यानंतर लगेचच पंत बाद झाला. सुंदरने त्यानंतर डाव सावरत अर्धशतक झळकावलं. दुसऱ्या दिवस अखेरीस भारताचा स्कोर २९४-७ असा आहे. वॉशिंग्टन सुंदर ६० धावांवर तर अक्सर पटेल ११ धावांवर खेळत आहे. भारताने ८९ धावांची आघाडी घेतली आहे.

Exit mobile version