दहा टक्के आर्थिक आरक्षणावर निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या घटनापीठासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीत हे आरक्षण वैध असल्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांनी स्वागत केले आहे. भविष्यातील पिढ्या घडवण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले पाहिजे. पण आरक्षणाबाबत राजकारण केले जाऊ नये असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
आरक्षणाचे नियम योग्य अभ्यास करून तपासले जातात. आरक्षणाचे नियम ठरवणारी एक वेगळी टीम असते. आर्थिसदृष्ट्या मागासलेल्या तरुण पिढीसाठी हा सकारात्मक निर्णय आहे. मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लागता जर आरक्षण देण्यात आले असेल तर त्याचे राजकारण करू नये असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
हे ही वाचा:
‘अजित पवारांची कुणालाही गॅरेंटी नाही’
‘मराठी मुस्लिम संकल्पनेचा प्रचार करणारे तोतया’
एका लग्नाची पुढची गोष्टचा १२,५०० वा प्रयोग, राज-फडणवीस उपस्थित राहणार
दिवंगत पत्रकार पांडुरंग रायकर यांना राष्ट्रवादीकडून ती मदत अद्याप नाही, पत्नीने केली विनंती
हा निर्णय भविष्यातील पिढ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. सामाजिक मागासले पण कायमचे सोडण्यासाठी आरक्षणाला कायम ठेवणे गरजेचे आहे. हा निर्णय घेताना एक व्यक्ती निर्णय घेत नसते, अभ्यास करून सर्व टीम काम करत असते, मात्र सामाजिक आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिल्याने त्याला विरोध का करावा, ते योग्यच आहे. असे सांगतानाच पंकजा मुंडे म्हणाल्या की कोणत्याही व्यक्तीने महिलांबदडलं आदरयुक्त टीका केली पाहिजे असे मत व्यक्त केले. महिलांवर टीका करताना पातळी राखणे गरजेचे आहे. सर्वानीच भान ठेऊन टीका केली पाहिजे असेही त्या म्हणाल्या.